What A Catch, मिलन रथनायकेचा अप्रतिम झेल, गस एटकीन्सन पाहतच राहिला
Milan Rathnayake Catch Gus Atkinson Video: श्रीलंकेच्या मिलन रथनायके याने इंग्लंडच्या गस एटकीन्सनचा कॅच घेऊ स्टेडियममधील क्रिकेट चाहत्यांना टाळ्या वाजवायला भाग पाडलं.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरी टेस्ट मॅच लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 427 धावा केल्या. इंग्लंडसाठी जो रुट याने 143 धावांची खेळी केली. तर गस एटकिन्सन याने 118 रन्स केल्या. इंग्लंडला या दोघांमुळे 400 पार मजल मारता आली. गसने आठव्या स्थानी बॅटिंगला येत 115 बॉलमध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 118 धावा केल्या. गस ज्या पद्धतीने खेळत होता, त्यानुसार त्याला आऊट करण्यासाठी चमत्काराचीच गरज आहे, असं वाटतं होतं. तसंच झालं आणि गसला मैदानाबाहेरचा रस्ता धरावा लागला.
श्रीलंकेच्या असिथा फर्नांडो याने आपल्या बॉलिंगवर गसला आऊट केलं. मिलन रथनायके याने बाउंड्री लाईनआधी गसचा अप्रतिम असा कॅच घेतला. गस पहिल्या डावातील 100 व्या ओव्हरमध्ये कॅच आऊट झाला. एटकीन्सन याने सिक्ससाठी मोठा फटका मारला. मात्र गसचा अंदाज चुकला. गसने मारलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने गेला. तिथे मिलन रथनायके होता. मिलन डाईव्ह मारत बाउंड्री लाईनवर हा अप्रतिम कॅच घेतला. मिलनने घेतलेल्या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
गस एटकिन्सन इंग्लंडसाठी लॉर्ड्समध्ये आठव्या किंवा त्यापेक्षा खाली येऊन कसोटीत शतक करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. गसआधी इलिंगवर्थ, गुब्बी एलन आणि स्टूअर्ट ब्रॉड या तिघांनी ही कामगिरी केली होती. इतकंच नाही, तर गस इंग्लंडचा पाचवा खेळाडू ठरला आहे, ज्याने पहिलवहिलं फर्स्ट क्लास शतक हे कसोटीत पूर्ण केलं आहे. गसआधी हेनरी वूड (1982), बिली ग्रिफिथ (1948), जेक रसेल (1989) आणि स्टूअर्ट ब्रॉड (2010) या चौघांनी हा कारनामा केला होतो.
काय कॅच घेतलाय!
A sensational catch marks the end of a brilliant innings 🤯
Well batted, Gus 🫡 pic.twitter.com/tVX53BZdT1
— England Cricket (@englandcricket) August 30, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकीन्सन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके
