AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs WI 2nd Test: शोएब बशीरचा विंडिजला ‘पंच’, इंग्लंड 241 धावांनी विजयी, मालिकाही जिंकली

England vs West Indies 2nd Test Match Result: पहिल्या सामन्यातील मानहानीकारण पराभवानंतर विंडिजने इंग्लंड विरूद्ध दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं होतं. मात्र इंग्लंडने विंडिजला दुसऱ्या डावात गुंडाळून चौथ्या दिवशी विजय मिळवला आणि मालिका जिंकली.

ENG vs WI 2nd Test: शोएब बशीरचा विंडिजला 'पंच', इंग्लंड 241 धावांनी विजयी, मालिकाही जिंकली
Shoaib bashir eng vs wiImage Credit source: AFP
| Updated on: Jul 22, 2024 | 12:49 AM
Share

इंग्लंड क्रिकेट टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर चौथ्या दिवशी 241 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. इंग्लंडने सामन्यासह मालिका जिंकली आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात जो रुट आणि हॅरी ब्रूक या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर 425 धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे विंडिजला विजयासाठी 385 धावांचं अवघड आव्हान मिळालं. विंडिजने दुसऱ्या डावातील बॅटिंगला आश्वासक सुरुवात केली. त्यामुळे सामन्याचा निकाल पाचव्याच दिवशी लागणार, हे निश्चित झालं होतं. मात्र इंग्लंडने विंडिजला झटपट झटके देत गुंडाळून टाकलं. विंडिजने पहिली विकेट 61 धावांवर गमावली. त्यानंतर विंडिजला इंग्लंडने 36.1 ओव्हरमध्ये 143 रन्सवर ऑलआऊट केलं. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

शोएब बशीरच्या 5 विकेट्स

विंडिजडून दुसर्‍या डावात कॅप्टन क्रेग ब्रेथवेट याने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर मिकील लुईस याने 17 रन्स केल्या. जेसन होल्डर याने 37 रन्स जोडल्या. तसेच जोशुआ डा सिल्वाने 14 धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांना काही खास करता आलं नाही. इंग्लंडकडून एकट्या शोएब बशीर याने 5 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ख्रिस वोक्स आणि गस एटीकन्सन या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्क वूड याच्या खात्यात 1 विकेट गेली.

त्याआधी जो रुट याच्या 122 आणि हॅरी ब्रूकने केलेल्या 109 रॅन्सच्या मदतीने इंग्लंडने 425 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे विंडिजला विजयासाठी 385 धावांचं आव्हान मिळालं. इंग्लंडने 3 बाद 248 धावांपासून पुढे चौथ्या दिवसाचा खेळाला सुरुवात केली. रुट 37 आणि ब्रूक 71 धावांवर खेळत होते. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. इंग्लंडचा लोअर ऑर्डर फ्लॉप ठरला. त्यानंतरही इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली.

जॉडेन सील्स याने ब्रूक याला आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर जो रुट याने एक बाजू लावून धरली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. जेसन होल्डर याने जो रुटला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर गस एटीकन्सन याने 21 धावांची भर घातली. विंडिजकडून जेडेन सील्स याने 4 विकेट्स घेतल्या. अल्झारी जोसेफने दोघांना बाद केलं. तर शामर जोसेफ, जेसन होल्डर आणि केविन सिंक्लेअर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

दरम्यान त्याआधी विंडिजने पहिल्या डावात 41 धावांची आघाडी मिळवली होती. इंग्लंडने केलेल्या 416 धावांचा पाठलाग करताना विंडिजने 457 धावांपर्यंत मजल मारली होती.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.

वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.