मँचेस्टर कसोटी रद्द होणं मोठ्या शर्मेची गोष्ट, इंग्लंडच्या खेळाडूने सोशल मीडिया पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी कोरोनाच्या शिरकावामुळे रद्द करण्यात आली. भारताचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील काहींना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून पाचवी टेस्ट रद्द करण्यात आली.

मँचेस्टर कसोटी रद्द होणं मोठ्या शर्मेची गोष्ट, इंग्लंडच्या खेळाडूने सोशल मीडिया पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना
इंग्लंड कसोटी संघ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Sep 13, 2021 | 11:46 AM

लंडन: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना दुर्दैवाने रद्द करण्यात आला. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने पुढे होता. पण शेवटचा सामना निर्णयाक असून त्याच सामन्यात भारत जिंकतो की मालिका अनिर्णीत राहते हे कळणार होतं. हा पाचवा सामना म्हणजेच मँचेस्टर कसोटी सामना रद्द करण्यात आल्यामुळे अनेक इंग्लंडवासियांचा हिरमोड झाला असून दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनही (James Anderson) या गोष्टीमुळे निराश आहे.

रवी शास्त्रींना कोरोनाची लागण झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणखी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. अखेर पाचवी कसोटी रद्द करण्यात आली.

जेम्स अँडरसनची भावूक पोस्ट

सामना रद्द झाल्याने जेम्स अँडरसनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक रिकाम्या मैदानाचा फोटो पोस्ट करत भावूक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये शेवटचा सामान रद्द झाल्यामुळे तो निराश झाला असल्याचं त्याने सांगितलं असून यामागे कारण म्हणजे  39 वर्षीय जेम्सला त्याचं होम ग्राऊंड असणाऱ्या मैदानात पुन्हा सामना खेळायला मिळेल का? ही चिंताही सतावत आहे.

View this post on Instagram

A post shared by James Anderson (@jimmya9)

जेम्सने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘आंतरराष्ट्रीय मालिकेचा अशाप्रकारे शेवट म्हणजे शर्मेची गोष्ट आहे. मी स्वत: या मालिकेचा नेमका काय शेवट होतो यासाठी उत्सुक होतो. तसेच शेवटच्या सामन्यासाठी उत्सुक प्रेक्षक तिकीट विकत घेणाऱ्यांसाठीही मला फार निराश वाटत आहे. मला आशा आहे लवकरच या मैदानात एक भारी सामना खेळवला जाईल.’

हे ही वाचा :

Manchester Test : ‘त्या’ रात्री भारतीय खेळाडू रात्री 3 वाजेपर्यंत झोपले नाहीत, टीम इंडियाच्या टीकाकारांना दिनेश कार्तिकची सडेतोड उत्तरं

इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची IPL 2021 मधून माघार, मँचेस्टर कसोटी रद्द झाल्याचा परिणाम?

IPL 2021 : रोहित शर्मा, बुमराह आणि सूर्यकुमार अबू धाबीत दाखल, सरावासाठी वाट पाहावी लागणार

(England bowler james anderson says its such shame to end india vs england series this way)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें