IND vs ENG : इंग्लंडला 119 धावांची गरज, इंग्लंडला विजयाची संधी, गोलंदाज बाजी पलटवतील? Match Prediction जाणून घ्या…

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो चांगली फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी झाली आहे. बेअरस्टो 72 आणि रूट 76 धावांवर नाबाद परतले. आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष असणार आहे.

IND vs ENG : इंग्लंडला 119 धावांची गरज, इंग्लंडला विजयाची संधी,  गोलंदाज बाजी पलटवतील? Match Prediction जाणून घ्या...
आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

Jul 05, 2022 | 7:05 AM

नवी दिल्ली : एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवसात इंग्लंड (ENG) संघाने आपली पकड मजबूत केलीय. 378 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 259 धावा केल्या. इंग्लंड संघाला पाचव्या दिवशी 119 धावा करायच्या आहेत. त्याचवेळी भारताला (IND) सात विकेट्सची गरज आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो चांगली फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी झाली आहे. बेअरस्टो 72 आणि रूट 76 धावांवर नाबाद परतले. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहनं (Jaspirt Bumrah) दुसऱ्या डावात दोन बळी घेतले. त्याने जॅक क्रोली (46) आणि ऑली पोप (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याचवेळी अ‍ॅलेक्स लीस धावबाद झाला. इंग्लंडविरुद्धच्या या पाचव्या कसोटीत भारतानं पहिल्या डावात 416 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 284 धावांवर गारद झाला आणि भारताला 132 धावांची आघाडी मिळाली. भारतानं दुसऱ्या डावात 245 धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडला 378 धावांचे लक्ष्य मिळालं.

सोमवारी काय झालं?

दुसऱ्या डावात भारतानं सोमवारी तीन बाद 125 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि 120 धावांची भर घालून संघ सर्वबाद झाला. पुजारा 66 धावा करून बाद झाला. त्याचवेळी पंतने 57 धावांची खेळी खेळली. पंतनं कसोटी कारकिर्दीतील 10वं अर्धशतक झळकावलं. श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना फार काही करता आलं नाही. दुसऱ्या डावात

पंत-पुजारा वगळता सर्व फलंदाज अपयशी

शुभमन गिल चार धावा, हनुमा विहारी 11 धावा, विराट कोहली 20 धावा, श्रेयस अय्यर 19 धावा, रवींद्र जडेजा 23 धावा, शार्दुल ठाकूर 4 धावा, मोहम्मद शमी 13 धावा आणि कर्णधार जसप्रीत बुमराह 13 धावा सात धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराज दोन धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅटी पॉट्सनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

इंग्लंडनं लक्ष्याचा पाठलाग केला

378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. संघानं 21 षटकांत 100 धावा केल्या होत्या. जॅक क्रॉली आणि अ‍ॅलेक्स लीस यांनी पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. लीसनं कसोटी कारकिर्दीतील दुसरं अर्धशतक झळकावलं. सामना 22 व्या षटकात फिरला आणि जसप्रीत बुमराहनं क्रॉलीला क्लीन बोल्ड केलं. क्राऊली 46 धावा करून बाद झाला.

त्यानंतर टी-ब्रेक आला. टी ब्रेकमधून परतल्यावर बुमराहनं पहिल्याच चेंडूवर ऑली पोपला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. पोप यांना खातेही उघडता आलं नाही. यानंतर पुढच्याच षटकात अ‍ॅलेक्स लीस धावबाद झाला. तो 65 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. तीन विकेट पडल्यानंतर रुट आणि बेअरस्टो यांनी जबरदस्त फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. आजचा (मंगळवार) दिवस भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.

इंग्लंडचा पहिला डाव

भारतानं पहिल्या डावात इंग्लंडला 284 धावांत गुंडाळलं. पहिल्या डावात इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली होती. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पहिले तीन धक्के दिले. त्याने अ‍ॅलेक्स लीस (6), जॅक क्रॉली (9) आणि ऑली पोप (10) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर जो रूटनं जॉनी बेअरस्टोसोबत 34 धावांची भागीदारी केली.

रुटला पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. रूट 67 चेंडूत 31 धावा काढून बाद झाला. रुटनं आपल्या खेळीत चार चौकार मारलं. नाईट वॉचमन जॅक लीच शून्यावर बाद झाला. त्याला मोहम्मद शमीनं यष्टिरक्षक पंतच्या हाती झेलबाद केलं. स्टोक्सनं जॉनी बेअरस्टोसोबत सहाव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली.

स्टोक्स 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर बेअरस्टोनं सॅम बिलिंग्ससोबत सातव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, बेअरस्टोनं कसोटी कारकिर्दीतील 11वे शतक झळकावले. त्याचे कसोटीतील हे सलग तिसरे शतक ठरलं. बेअरस्टोला विराट कोहलीच्या हातून मोहम्मद शमीनं झेलबाद केलं.

बेअरस्टो 106 धावा करू शकला. त्यानंतर सिराजने बिलिंग्ज, स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅटी पॉट्स यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा डाव गुंडाळला. अँडरसन सहा धावांवर नाबाद राहिला. भारताकडून सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी बुमराहने तीन आणि शमीनं दोन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.

भारताचा पहिला डाव

भारताचा पहिला डाव 416 धावांवर आटोपला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात काही खास झाली नाही. 27 धावांवर संघाची पहिली विकेट पडली. गिल 17 धावा करून बाद झाला. यानंतर पुजाराही 13 धावा करून बाद झाला. हनुमा विहारी 20 आणि विराट कोहली 11 धावांवर बाद झाला.

भारताच्या पाच विकेट 98 धावांत पडल्या. यानंतर पंतने जडेजासोबत 222 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला सांभाळलं. त्यानं 146 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी जडेजानं 104 धावा केल्या. शेवटी, जसप्रीत बुमराहनं 16 चेंडूत 31 धावा करत भारताची धावसंख्या 416 पर्यंत नेली. जेम्स अँडरसननं मोहम्मद सिराजला बाद करून भारताचा डाव संपवला. सिराजनं सहा चेंडूंत दोन धावा केल्या.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो चांगली फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी झाली आहे. बेअरस्टो 72 आणि रूट 76 धावांवर नाबाद परतले. भारत विरुद्ध इंग्लंड एजबॅस्टन कसोटी

आजच्या सामन्याकडे लक्ष

378 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 259 धावा केल्या. इंग्लंड संघाला पाचव्या दिवशी 119 धावा करायच्या आहेत. त्याचवेळी भारताला सात विकेट्सची गरज आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो चांगली फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी झाली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें