Video : इंग्लंडचा ऑली रॉबिनसन गोलंदाजी करणंच विसरून गेला, एका षटकात दिल्या 43 धावा
टी20 वर्ल्डकपचा थरार सुरु असताना दुसरीकडे इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई होत होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिनसनची मजबूत फोडला. एका षटकात 43 धावा दिल्या. रॉबिनसन गोलंदाजी करणंच विसरला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. रॉबिनसनच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात महागडं षटक टाकल्याचा नको तो विक्रम नोंदवला गेला आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिनसन याच्या गोलंदाजीची धार बोथट झाल्याचं दिसून आलं आहे. रॉबिनसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा असो की विराट कोहली या सारख्या दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. पण आज त्याच्या गोलंदाजीची लय पूर्णपणे बिघडल्याचं दिसून आलं. ऑली रॉबिनसनने एका षटकात 43 धावा दिल्या. त्यामुळे ऑली रॉबिनसनच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात महागडं षटक टाकणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. रॉबर्ट वेंसने कॅंटरबरीविरुद्धच्या सामन्यात 1989-90 मध्ये 77 धावा दिल्या होत्या. त्यानंतर आता ओली रॉबिनसनचा नंबर लागला आहेत .रॉबिनसनने लीस्टरशरविरुद्ध खेळता एकूण 9 चेंडू टाकले. त्यापैकी 8 चेंडूंनी सीमारेषा ओलांडली. लुईस किंबरने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. संघाचं 59 वं षटक टाकताना ऑली रॉबिनसन गोलंदाजी करणंच विसरून गेला. या संधीचा पुरेपूर फायदा किंबरने घेतला आणि प्रहार केला.
पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करत षटकार मारला. दुसरा चेंडू नो बॉल टाकला आणि त्यावर चौकार आला. पुन्हा टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. तिसऱ्या चेंडूवर किंबरने षटकार मारला. चौथ्या चेंडूवर चौकार मारला पण नो बॉल होता. पाचव्या चेंडूवर चौकार मारला हा चेंडूही नो होता. मग चौथ्या आणि पाचव्या दोन चेंडूवर दोन चौकार आले. इंग्लीश काउंटीमध्ये नो बॉलवर दोन धावा असतात. त्यामुळे एकूण बेरीज करता त्याने 43 धावा दिल्या. इंग्लंडच्या कसोटी संघातील ओली रॉबिनसन हा महत्त्वाचा खेळाडू आहे. जेम्स अँडरसननंतर त्याच्याकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे. त्यामुळे त्याच्या अशा गोलंदाजीने क्रीडाप्रेमींना चिंता वाटत आहे.
LOUIS KIMBER HAS TAKEN 43 OFF AN OVER pic.twitter.com/kQ4cLUhKN9
— Vitality County Championship (@CountyChamp) June 26, 2024
ऑली रॉबिनसनने या षटकातील प्रत्येक चेंडू शॉट टाकला. त्याचा फायदा किंबरने घेतला आणि चेंडू सीमेपार पोहोचवले. रॉबिनसन इंग्लंडसाठी 20 कसोटी सामने खेळला असून 76 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडून अशा गोलंदाजीची अपेक्षा नव्हती. या सामन्यात किंबरनेही एका विक्रमाची नोंद केली आहे. त्याने 100 चेंडूत द्विशतक ठोकलं. काउंटी क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक आहे.
