IND vs ENG : 36 वर्षात भारतीय गोलंदाजांची वाईट स्थिती, बेन डकेट-जेकब बेथेल यांनी रचला इतिहास

इंग्लंडने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाजी एकदम सुमार दर्जाची असल्याचं दिसून आलं आहे. या सामन्यात इंग्लंडच्या सलामीवीर बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी 36 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.

IND vs ENG : 36 वर्षात भारतीय गोलंदाजांची वाईट स्थिती, बेन डकेट-जेकब बेथेल यांनी रचला इतिहास
IND vs ENG : 36 वर्षात भारतीय गोलंदाजांची इतकी वाईट स्थिती, बेन डकेट-जेकब बेथेल यांनी रचला इतिहास
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 19, 2026 | 6:40 PM

Ben Duckett-Jacob Bethell, IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर तिसरा वनडे सामना सुरू आहे. या निर्णायक सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारतीय गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. सलामीवीर बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी भारतीय गोलंदाजांची लाइन अँड लेंथ पूर्णपणे अस्तव्यस्त केली. यावेळी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची सर्वांना आठवण आली. कारण त्याच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाजी इंग्लंडसमोर निष्प्रभ ठरली. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. इंग्लंडकडून बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी पहिल्या विकेटसाठी 181 चेंडूत 192 धावांची भागीदारी केली. यात जेकेब बेथेल 91 धावा करून बाद झाला.

36 वर्षांचा दुष्काळ दूर केेला

बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी लॉर्ड्स मैदानावर 36 वर्ष जुना दुष्काळ संपुष्टात आणला आहे. या दोघांच्या शतकी भागीदारीनंतर इंग्लंडचा 36 वर्षांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपली आहे. लॉर्ड्सवर भारताविरुद्ध शेवटची शतकी भागादारी इंग्लंडच्या सलामीवीरांनी 1990 मध्ये केली होती. हा कसोटी सामना होता. तेव्हा इंग्लंडचे सलामीवीर ग्रॅहम गूच आणि मायकल आथरटन यांनी शतकी भागीदारी केली होती. त्यानंतर आता वनडे सामन्यात बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी शतकी भागीदारी केली आहे. तर 2010 नंतर म्हणजेच 26 वर्षांनी या मैदानात इंग्लंडने हा कारनामा केला आहे. 2010 मध्ये अँड्र्यूज स्ट्रॉस आणि स्टीव्हन डेविस यांनी पाकिस्तानविरुद्ध 113 धावांची भागीदारी केली होती.

वनडे क्रिकेटमध्येही इंग्लंडचा दुष्काळ संपला

वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही इंग्लंडची सलामी जोडीची शतकी भागीदारी प्रदीर्घ कालावधीनंतर आली आहे. तीन वर्षानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी हा कारनामा केला आहे. 2013 मध्ये वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध जॉनी बेयरस्टो आणि डेविड मलान यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली होती. या सामन्यानंतर इंग्लंडची सलामीची जोडी वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही मैदानात शतकी भागीदारी करू शकलं आहे.

Follow Us