AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१० मिनिटांसाठी मी मृत झालो होतो, श्रेयस तळपदे याने कार्डियक अरेस्टचा थरारक अनुभव सांगितला…

श्रेयस तळपदे याचा 'वेलकम टु द जंगल' चित्रपट रिलीज झाला असून त्याला यश देखील मिळाले आहे. एका मुलाखतीत श्रेयसने त्याला तीन वर्षांपूर्वी आलेल्या कार्डियक अरेस्ट संदर्भात आपला अनुभव सांगितला.

१० मिनिटांसाठी मी मृत झालो होतो, श्रेयस तळपदे याने कार्डियक अरेस्टचा थरारक अनुभव सांगितला...
Shreyas Talpade cardiac arrest
| Updated on: Jul 19, 2026 | 6:42 PM
Share

बॉलीवुड अभिनेता श्रेयस तळपदे गेल्या २० वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीज काम करत आहे. श्रेयस तळपदे यांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. अलिकडे त्याचा ‘वेलकम टु द जंगल’ चित्रपट रिलीज झाला असून तो बॉक्स ऑफीसवर हीट झाला आहे. श्रेयसची भूमिका देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान श्रेयस तळपदे याच्या सोबत एक दुर्घटना घडली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्याला कार्डियक अरेस्ट आला होता. ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा किस्सा श्रेयस तळपदे याने सांगितला आणि तो म्हणाला १० मिनिटे माझे हृदय बंद पडले होते….

‘वेलकम टु द जंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता श्रेयद तळपदे याला साल २०२३ मध्ये कार्डियक अरेस्ट आला होता.त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती केले होते. त्याची तब्येत शुटींगच्या दरम्यान बिघडली होती. त्याची पत्नी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती. तेव्हा अभिनेता बेशुद्ध झाला होता. मग डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर आणले, मग कसेतरी तो शुद्धीवर आला आणि त्याची सर्जरी झाली.

श्रेयसची जीवन आणि मृत्यूशी लढाई

अलिकडेच श्रेयस तळपडे यांनी या संपूर्ण घटनेला पु्न्हा एकदा उजाळा दिला. कर्ली टेल्सच्या युट्युब चॅनलला मुलाखत देताना अभिनेत्याने सांगितले की हे माझे दुसरे जीवन आहे जे मिळाले आहे. या दुर्घटनेनंतर त्याला दैनंदिन जीवनशैलीत बदल केले. श्रेयस तळपदे यांनी सांगितले की ती वेळ माझा आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण आणि धक्कादायक होते.

त्यानंतर माझे जीवन खूपच बदलले, आधी मी केवळ कामाला महत्व देत होतो. माझ्यासाठी माझे काम खूप महत्वाचे होते. मी सांगत होतो की मला काम करायचे आहे. आणि माझ्या कुटुंबाला क्वालिटी टाईम द्यायचा आहे. मात्र, त्या एका क्षणात सर्वकाही झाले. त्या १० मिनिटात मी तांत्रिकदृष्ट्या मृत झालो होतो. माझ्या हृदयाचे ठोके दहा मिनिटांसाठी बंद झाले होते. त्यांना मला पुन्हा जीवंत करावे लागले. तुम्ही जे चित्रपटात पाहाता. त्यांनी मला CPR दिला आणि नंतर इलेक्ट्रीक शॉक देऊन माझ्या हृदय पुन्हा सुरु केले.

कामच जीवनात सर्वकाही नाही

श्रेयस तळपदे याने सांगितले की त्याना कार्डियक अरेस्ट त्यांच्या गाडीत आला होता. त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याला सांभाळले आणि रुग्णालयात घेऊन गेली. जेव्हा त्याला अरेस्ट आला तेव्हा तो रुग्णालयाच्या जवळच होता. त्याचे तातडीने ऑपरेशन करण्यात आले. श्रेयल तळपदे याने सांगितले की त्या एका क्षणाने त्याला जाणीव करुन दिली की कामच जीवनात सर्वकाही नाही आणि तो त्याच्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ देतो.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ