AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray : आज मुंबईत ठाकरे गटाकडून सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा... उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray on Bhagwat and ModiImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 19, 2026 | 5:36 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते हजर आहेत. सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ असणाऱ्या या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

भागवत यांनी आपण हिटलर सारखे नाही हे मोदींना सांगावे…

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘मी काल नागपुरात होतो. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र आहे. या संघाच्या होसबळेने कालच्या मे महिन्यात स्टेटमेंट दिलं. पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे. जो पाकिस्तान आतंकवादी घुसवतो. हल्ले करतो त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजे. भागवतांना विचारलं तर म्हणतात बरोबर आहे. हम हिटलर जैसे नही है. अहो भागवत साहेब हिटलर सारखे नाही हे मोदींना सांगा. पाकिस्तानसोबत चर्चेची तयारी आहे. मग वांगचुकसोबत का नाही करत? जो देश सैनिकांचे बळी घेतो त्याच्याशी चर्चा. आणि जो माणूस सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतो त्याच्याशी चर्चा नाही. अशी माणसं मिळत नाही. एवढा फौजफाटा का आणताय? पाक व्याप्त काश्मीरात घुसवा या फौजा.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जण विचारतात मेलोडी खाओ खुद जान जाओ. फिर मुझे बात करने की क्या बात है. मेलडी खाओ और खुद्द जान जाओ. तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. आम्ही देशभक्त आहोत. हिंदू आहोत. शेंडी जाणव्याचे हिंदू नाही. म्हणून भागवतांना विचारलं जे आज देशात सुरू आहे हे तुमच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र चालतं का. हे हिंदू राष्ट्र आहे? आम्हाला हे हिंदू राष्ट्र मान्य नाही.

आपल्याला सरकार बदलायचं आहे…

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘आता एक पोस्टर होतं. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ही शुल्लक गोष्ट आहे. हे पण एकदम शुल्लक आहे. हा लढा आता हे सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचं आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. एकच वचन द्या. ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झालं पाहिजे.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...