AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर चॅलेंज, इंग्लंडच्या संघात लांबलचक SIX मारणाऱ्या खेळाडूंचा भरणा

IND vs ENG: कसोटी सामना गमावल्यानंतर आता टी 20 सीरीज (T20 Series) मध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

IND vs ENG: टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर चॅलेंज, इंग्लंडच्या संघात लांबलचक SIX मारणाऱ्या खेळाडूंचा भरणा
ind vs engImage Credit source: instagram
| Updated on: Jul 07, 2022 | 3:05 PM
Share

मुंबई: कसोटी सामना गमावल्यानंतर आता टी 20 सीरीज (T20 Series) मध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. टीम इंडिया साऊथम्पटनमध्ये इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) पहिला टी 20 सामना खेळणार आहे. विजयी सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण इंग्लंडला नमवणं इतकं सोप नाहीय, कारण मर्यादीत षटकाच्या फॉर्मेट मध्ये इंग्लंडचा संघ जास्त धोकादायक आहे. एका ओव्हरमध्ये सामन्याच नूर पालटण्याची क्षमता असलेले खेळाडू इंग्लंडच्या संघात आहेत. जोस बटलरकडे (Jos buttler) संघाचं नेतृत्व आहे. तो सध्या कमालीचा फॉर्म मध्ये आहे. आजच्या सामन्यासाठी इंग्लंड कुठल्या खेळाडूंना संधी देईल, काय असेल इंग्लंडची प्लेइंग 11 ते जाणून घेऊया.

भल्या-भल्या गोलंदाजांची दिशा आणि टप्पा बिघडवू शकतात

इंग्लंडकडे टी 20 फॉर्मेट मध्ये असे काही खेळाडू आहेत, जे भल्या-भल्या गोलंदाजांची दिशा आणि टप्पा बिघडवू शकतात. जोस बटलरशिवाय जेसन रॉय, डेविड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मोइन अली हे इंग्लिश खेळाडू धोकादायक आहेत. मलान, रॉय आणि बटलरने नेदरलँड विरुद्धच्या सीरीजमध्ये आपली क्षमता दाखवून दिलीय. त्याशिवाय फिल सॉल्टक़डे इंग्लंडच भविष्य म्हणून बघितलं जातय.

इंग्लंडकडे कुठले गोलंदाज

इंग्लंडकडे चांगले गोलंदाज आहेत. डेविड विली, रीस टॉप्ली यांच्याशिवाय ख्रिस जॉर्डन आणि टायमल मिल्स इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची ताकत आहेत. आदिल रशिदच्या अनुपस्थितीत इंग्लंडकडे टी 20 मध्ये अनुभवी फिरकी गोलंदाज नाहीय. मॅथ्यू पार्किन्सनकडे फिरकी गोलंदाजीची जबाबदारी आहे.

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग 11

जोस बटलर (कॅप्टन), जेसन रॉय, डेविड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोइन अली, फिल सॉल्ट, सॅंम करन, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, रीस टॉप्ली आणि मॅथ्यू पार्किन्सन

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन,), इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार,

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.