AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England Test Squad: कुचकामी ठरला म्हणून ज्या खेळाडूला संघातून काढलं, तो घेणार बेन स्टोक्सची जागा

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेच्या दोन सामन्यांसाठी इंग्लंडने कसोटी संघ जाहीर केला आहे. या मालिकेला 19 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.

England Test Squad: कुचकामी ठरला म्हणून ज्या खेळाडूला संघातून काढलं, तो घेणार बेन स्टोक्सची जागा
England Test Squad: कुचकामी ठरला म्हणून ज्या खेळाडूला संघातून काढलं, तो घेणार बेन स्टोक्सची जागाImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 06, 2026 | 4:57 PM
Share

इंग्लंड संघाने कसोटी फॉर्मेटमध्ये कात टाकली असून जो रूटच्या नेतृत्वात नव्या पर्वाला सुरूवात होणार आहे. बेन स्टोक्स निवृत्ती घेतल्यानंतर आणि ब्रँडन मॅक्कलमला पदावरून काढल्यानंतर इंग्लंडने नव्याने संघ बांधला आहे. मागच्या चार वर्षांपासून बेन स्टोक्स आणि ब्रँडन मॅक्कलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघ बेजबॉल पॅटर्न क्रिकेट खेळत होता. मात्र आता या दोघांच्या गैरहजेरीत इंग्लंड संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. इंग्लंड पहिली कसोटी मालिका पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली असून डॅन लॉरेंस, ओली पोप आणि ब्रायडन कार्स या खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे.

दोन वर्षानंतर परतरणार लॉरेंस घेणार स्टोक्सची जागा

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्याची कसोटी मालिका होत आहे. ही मालिका 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तसं पाहिलं तर दोन्ही संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण इंग्लंडचा संघ नव्या बांधणीसह उतरणार असल्याने सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. जो रूटच्या खांद्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा आहे. तर स्टीफन फ्लेमिंग यांची कोच म्हणून नियुक्ती केली आहे. पण या मालिकेत त्यांचं मार्गदर्शन लाभणार नाही. त्यामुळे कोचची भूमिका मार्कस ट्रेस्कोथिक बजावणार आहेत. असं असताना डॅन लॉरेंस संघात परतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

डॅन लॉरेंस यापूर्वी इंग्लंड संघात खेळलाला आहे. त्याने ओपनिंग ते मधल्या फळीपर्यंत फलंदाजी केली आहे. पण त्याला फलंदाजीत हवी तशी छाप सोडता नाही. त्याने 14 कसोटी सामन्यात 671 धावा केल्या. पण त्याला एकही शतक ठोकता आलं नाही. डॅन लॉरेंस दोन वर्षापूर्वी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून डावलण्यात आलं होतं. पण त्याला पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे. त्यामुळे अष्टपैलू बेन स्टोक्सची जागा घेऊ शकतो. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं की, सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करे आणि ऑफ स्पिनर म्हणून गोलंदाजी करेल.

इंग्लंड क्रिकेट बोर्डानुसार, डॅन लॉरेंससह माजी उपकर्णधगार ओली पोप आणि वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स यांनाही संघात स्थान दिलं गेलं आहे. या दोघांना एशेज मालिकेत सुमार कामगिरी केल्याने बाहेरचा रस्ता दाखवला होता. मतर 2026 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला सॅम कुकला संधी दिली आहे. दोन सामन्यांसाठी संघात निवडलं आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या जॉर्डन कॉक्सचं फलंदाजीच्या क्रमात प्रमोशन झालं आहे. जॅकब बेथलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर उतरले. बेथेल दुखापतीमुळे या मालिकेला मुकला आहे.

इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, डॅन लॉरेंस, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जेमी स्मिथ, जॉश टंग.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...