AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England Tour India | टीम इंडियाला भारतात पराभूत करणं अवघड : जो रुट

इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे.

England Tour India | टीम इंडियाला भारतात पराभूत करणं अवघड : जो रुट
टीम इंडिया
| Updated on: Jan 22, 2021 | 1:29 PM
Share

कोलंबो :टीम इंडियाला (Team India) त्यांच्याच देशात पराभूत करणं हे फार अवघड आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील (Border Gavaskar Tropy) पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताने शानदार पुनरागमन करत मालिका जिंकली. भारताचा मालिका विजय हा कसोटी क्रिकेटसाठी शानदार होता. त्यांना भारतात पराभूत करणं कठीण आहे. पण आव्हान देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या दौऱ्यात सर्वोत्तम कामगिरी करु, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार (England Captain Joe Root) जो रुटने दिली. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर (England Tour India 2021) येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. (england tour india 2021 its very difficult to beat team india in india said england captain joe root)

रुट काय म्हणाला?

“ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका ही फार शानदार होती. या सीरिजमध्ये टीम इंडियाचे खेळाडू अनेक आव्हानांना सामोरे गेले. त्यांनी फार संघर्ष केला. यातून टीम वर्क काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं”, असं रुट म्हणाला.

“एक क्रिकेट फॅन म्हणून मी या मालिकेचा फार आनंद लुटला. भारत दौरा हा फार रंगतदार असेल. टीम इंडियाचा ऑस्ट्रेयिलियाविरोधातील मालिका विजयामुळे विश्वास दुणावला आहे. भारतीय संघ फार मजबूत आहे. आपल्या होमपीचवर कशी कामगिरी करायची, याची त्यांना चांगली माहिती आहे. यामुळे आमच्यासमोर तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे आमच्यासमोर सर्वोत्तम कामगिरी करण्याचं चॅलेंज असेल. आमच्यासाठी ही मालिका फार रोमांचक असेल. आम्ही मालिका जिंकण्याच्या उद्देशानेच भारतात येणार आहोत. यासाठी आम्हाला जोरदार सराव करावा लागेल, असंही रुटने नमूद केलं.

केविन पीटरसनचे ट्विट

दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने भारत दौऱ्याबाबत एक ट्विट केलंय. “भारताने सर्व अडचणींवर मात करत ऑस्ट्रेलियाविरोधात ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे. इंग्लंडचा संघ लवकरच भारतात येणार आहे. इंग्लंडविरोधात भारताला आपल्या घरात पराभूत व्हावं लागेल. त्यामुळे सावध रहा, असं ट्विट करत पीटरसनने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 4 सामन्यांची सीरिज असणार आहे. यानंतर 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. शेवटी वनडे सीरिज खेळली जाणार आहे. भारताविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंडच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि सलामीवीर रोरी बर्न्सचे संघात पुनरागमन झालं आहे. यामुळे इंग्लंडला मजबूती प्राप्त झाली आहे. तर जो रुटच्या खांद्यावर इंग्लंडची जबाबदारी असणार आहे.

पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीची टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरी कसोटी – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरी टेस्ट – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

संबंधित बातम्या :

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

(england tour india 2021 its very difficult to beat team india in india said england captain joe root)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.