AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियासाठी पहिल्या कसोटीआधी गूड न्यूज, 23 वर्षांची प्रतिक्षा संपणार!

England vs India : आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या 3 अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. मात्र इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला गूड न्यूज मिळाली आहे.

IND vs ENG : टीम इंडियासाठी पहिल्या कसोटीआधी गूड न्यूज, 23 वर्षांची प्रतिक्षा संपणार!
Shubman Kuldeep Yashasvi Image Credit source: PTI
| Updated on: Jun 18, 2025 | 9:05 AM
Share

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध शुबमन गिल याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा हेडींग्ले लीड्समध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाची हेडिंग्ले लीड्स येथे कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. टीम इंडियाने या मैदानात 2002 साली शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. तर 2021 साली या स्टेडियममध्ये शेवटचा सामना खेळला होता. भारताला त्या सामन्यात डाव आणि 76 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र आता इंग्लंड दौऱ्यातील सलामीच्या सामन्याआधी टीम इंडियाला गूड न्यूज मिळाली आहे.

हेडिंग्ले मैदानाचे पीच क्युरेटर यांनी दिलेल्या माहितीमुळे टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. पीच क्युरेटर रिचर्ड रॉबिन्सन याने दिलेल्या माहितीनुसार, ही खेळपट्टी यंदा नेहमीपेक्षा वेगळा खेळ दाखवणार आहे. लीड्समध्ये सध्या फार उकाडा आहे. त्यामुळे बॅटिंगसाठी मदत होऊ शकते.

पीच क्युरेटर काय म्हणाले?

लीड्समध्ये तापमान फार जास्त आहे. त्याचा थेट परिणाम हा खेळपट्टीवर होईल, असं पीच क्युरेटर रिचर्च रॉबिन्सन यांनी म्हटलं. “सामन्यादरम्यान उष्णता असेल. त्यामुळे आम्ही खेळपट्टी साधारण ओली करु. आता इंग्लंड टीमला काय हवंय, हे देखील पाहू. पहिल्या डावात 300 धावा केल्यास टीम आनंदी असेल. इथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या इतकीच राहिली आहे. तसेच दिवसनिहाय ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक ठरेल. लीड्समधील तापमान 27-28 डिग्री इतकं असेल. त्यामुळे जसा जसा सामना पुढे जाईल तसं तसं खेळपट्टी सपाट होईल “, असं पीच क्युरेटर रॉबिन्सनने रेव्हस्पोर्ट्सोबत बोलताना म्हटलं.

खेळपट्टी सपाट राहिल्यास टीम इंडियाच्या फलंदाजांना मदत होईल. टीम इंडियाचे फलंदाज इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत अपयशी राहिले आहेत. मात्र लीड्समधील खेळपट्टीने साथ दिल्यास हे चित्र बदलू शकतं.

टीम इंडियासाठी पहिला सामना निर्णायक

टीम इंडियासाठी पहिला सामना हा मालिकेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. टीम इंडियाकडे पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेण्याची संधी आहे. आघाडी घेतल्यास टीम इंडियाचा विश्वास आणखी वाढू शकतो. टीम इंडियाने या मैदानात अखेरीस 2002 साली सौरव गांगुली याच्या नेतृत्वात विजय मिळवला होता. तेव्हापासून टीम इंडियाची या मैदानात विजयी होण्याची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे यंदा शुबमन गिल याने भारताला 23 वर्षांनंतर लीड्समध्ये विजयी करावं, अशी आशा चाहत्यांना आहे.

टीम इंडियाने आतापर्यंत हेडिंग्ले, लीड्स येथे या मदैानात एकूण 7 सामने खेळले आहेत. टीम इंडियाला त्यापैकी फक्त 2 सामन्यांमध्येच विजयी होता आलं. तर 4 वेळा पराभूत व्हावं लागलंय. तर 1 सामना अनिर्णित राखण्यात यश आलं.

Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.