AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Womens Odi World Cup : वूमन्स वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टीम जाहीर, नॅट सायव्हर ब्रँट कॅप्टन, पहिला सामना केव्हा?

England Squad For Icc Womens ODI World Cup 2025 : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला काही आठवड्यानंतर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतानंतर इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Icc Womens Odi World Cup : वूमन्स वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टीम जाहीर, नॅट सायव्हर ब्रँट कॅप्टन, पहिला सामना केव्हा?
England Womens Cricket TeamImage Credit source: @englandcricket x Account
| Updated on: Aug 23, 2025 | 12:43 AM
Share

आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. भारतातील 4 आणि श्रीलंकेतील 1 अशा एकूण 5 शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघाची 19 ऑगस्टला घोषणा करण्यात आली. त्यानुसार हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रं असणार आहेत. त्यानंतर आता इंग्लंड महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

इंग्लंडने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तसेच हीथर नाईट हीचं अनेक महिन्यांनंतर कमबॅक झालं आहे. तसेच आशियातील स्थितीचा विचार करता निवड समितीकडून या 15 सदस्यीय संघात 4 फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे.

हीथर नाईटचं कमबॅक

हीथरचं अनेक महिन्यानंतर संघात पुनरागमन झालं आहे. हीथरने जानेवारी 2025 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर हीथरला दुखापतीमुळे अनेक मालिकांना मुकावं लागलं. तसेच सारा ग्लेन आणि डेनी व्याट या दोघांचंही कमबॅक झालं आहे. या दोघी टीम इंडिया विरुद्ध मायदेशात झालेल्या एकदिवसीय संघात नव्हत्या. ग्लेन 4 प्रमुख फिरकीपटूंपैकी एक आहे. तसेच इंग्लंड संघातील 6 खेळाडूंची वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे.

इंग्लंडचा पहिला सामना केव्हा?

दरम्यान इंग्लंड वनडे वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 3 ऑक्टोबरला खेळणार आहे. इंग्लंडसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. त्यानंतर इंग्लंड बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध 2 हात करणार आहे. चौथ्या सामन्यात इंग्लंड श्रीलंकेत पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील सामना हा 19 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर इंग्लंडसमोर साखळी फेरीतील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 साठी इंग्लंड वूमन्स टीम :   नॅट सायव्हर-ब्रँट (कॅप्टन), एम अर्लट, टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, एलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फायलर, सारा ग्लेन, एमी जोन्स, हीथर नाइट, एम्मा लॅम्ब, लिन्सी स्मिथ आणि डॅनी व्याट-हॉज.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.