INDW vs ENGW T20 : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी घेत कर्णधार ब्रंट म्हणाली…
भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये टी20 मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी निवडली आहे. कसे आहेत दोन्ही संघ आणि कर्णधार काय म्हणाले ते जाणून घ्या.

भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. “हे चांगले विकेट दिसतेय, मी येथे खूप क्रिकेट खेळलो आहे. जोरदार वेगवान गोलंदाजीसह खेळण्यास उत्सुक आहे.”, असं नॅट सायव्हर-ब्रंट म्हणाली. पहिल्याच सामन्याला कर्णधार हरमनप्रीत कौर मुकली आहे. तिच्या ऐवजी कर्णधारपदाची धुरा स्मृती मंधानाच्या खांद्यावर दिली आहे. हरमनप्रीत डोक्याला दुखापतीमुळे बाहेर आहे. “मला खात्री आहे की ती काही दिवसांतच बरी होईल,” असं भारतीय संघाची कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली. तिन हरलीन देओलला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला घेतले आहे आणि श्री चरणीला पदार्पण दिले आहे.
ईसीबी सिलेक्ट इलेव्हन विरुद्धच्या टी20 सराव सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून तिला पहिल्या टी20 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. वैद्यकीय पथक तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि तिची प्रकृती सुधारत आहे. तिच्या अनुपस्थितीत स्मृती मंधाना संघाचे नेतृत्व करत आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी प्रयत्न असेल. इंग्लंड आणि भारत महिला टी20 सामन्यात 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यात इंग्लंडचं पारडं जड आहे. यात इंग्लंडने 22 वेळा, तर भारताने 8 वेळा विजय मिळवला आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये 13 सामने खेळला आहे. यापैकी 9 सामन्यात इंग्लंडने, तर चार सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आता पहिल्याच सामन्यात भारताची कामगिरी कशी असेल याकडे लक्ष लागून आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, डॅनिएल व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (यष्टीरक्षक), एलिस कॅप्सी, सोफी एक्लेस्टोन, एम आर्लॉट, लॉरेन फाइलर, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), शफाली वर्मा, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्री चरणी
