IPL 2021: शारजाहच्या मैदानात 16 वर्षांहून कमी वयाच्या प्रेक्षकांना बंदी, प्रत्येक मैदानातील नियम वेगवेगळे

आय़पीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. बऱ्याच काळानंतर प्रेक्षक आयपीएल पाहण्यासाठी मैदानात जाणार आहेत.

IPL 2021: शारजाहच्या मैदानात 16 वर्षांहून कमी वयाच्या प्रेक्षकांना बंदी, प्रत्येक मैदानातील नियम वेगवेगळे
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 4:37 PM

दुबई: आयपीएलचे (IPL 2021) उर्वरीत पर्व कोरोनाच्या संकटामुळे युएईत (UAE) सुरु होत आहे. उर्वरीत सामन्यांसाठी सर्वच क्रिकेटप्रेमी कमालीचे उत्सुक आहेत.  उर्वरीत 31 सामन्यांना आजपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्या सामन्याने होत आहे. उर्वरीत आयपीएलमध्ये सर्व संघामध्ये चुरस तर दिसणारच आहे, पण सोबतच एक खास गोष्ट म्हणजे या सामन्यांना प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंचाही उत्साह वाढणार आहे हे नक्की! पण प्रत्येक मैदानात प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी वेगवेगळे नियमही लागू करण्यात आले आहेत.

उर्वरीत आयपीएलचे काही सामने हे प्रसिद्ध अशा शारजाह स्टेडियममध्ये देखील खेळवले जाणार आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार या स्टेडियममध्ये 16 वर्षांहून कमी वय असलेल्या प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार नाही. तसंच स्‍टेडियममध्ये येण्यापूर्वी सर्व कोरोनासंबधी काळजी घेत तापमान वैगेरेही तपासलं जाणार आहे. तसंच लसीकरणासंबधी तपासणीही यावेळी केली जाईल. तसचं 48 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर रिपोर्टही प्रेक्षकांना दाखवणं अनिवार्य आहे.

दुबईमध्ये प्रमाणपत्र आवश्यक

शारजाहसह दुबईच्या मैदानातही सामने होणार असून यावेळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये प्रेक्षकांना आरटी पीसीआर रिपोर्ट दाखवण्याची गरज नसली तरी दोन्ही लशींचे डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं मात्र आवश्यक आहे. तसेच लसीकरणासाठी वय कमी असलेल्यांना अशी अट नसली तरी सर्वांना मास्क आणि इतर काळजी घेणे अनिवार्य आहे. शारजाह आणि दुबई मैदानानंतर अबुधाबीच्या शेख जायद मैदानातही काही सामने असून या ठिकाणीही आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट अनिवार्य असून  12 वर्षाखालील प्रेक्षकांसोबत 21 वर्षांवरील प्रेक्षकाचे असणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा 

आजपासून IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांचे रणशिंग फुंकले जाणार, युएईमध्ये सुरु होणार धमाकेदार सामने, सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर!

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी

(Fans below 16 not allowed entry at sharjah stadium due to covid 19 precautions)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.