IND vs SL : श्रीलंका संघात पुन्हा बदल, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार, भारताविरुद्ध विजयासाठी घेतला निर्णय

भारताचे युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. दोन्ही संघ मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज झाले असून यापूर्वीच श्रीलंका संघात एक मोठा बदल झाला आहे.

IND vs SL : श्रीलंका संघात पुन्हा बदल, 'हा' खेळाडू असणार कर्णधार, भारताविरुद्ध विजयासाठी घेतला निर्णय
दासुन शनाका

कोलंबो : भारतीय क्रिकेट युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार भारतीय टीम कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल. त्यानंतर टी-20 सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. हे सामने सुरु होण्याआधीच श्रीलंका संघाने (Sri Lanka Cricket Team) एक मोठा बदल केला आहे. मालिकेसाठीचा संघ जाहिर करण्यापूर्वीच कर्णधार बदलला असल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लंड दौऱ्यावर कर्णधार असलेला कुसल परेरा (Kusal Perera) याच्या जागी अष्टपैलू दासुन शनाका (Dasun Shanaka) याला संघाचा कर्णधार करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंका संघाला दारुण पराभव स्विकरावा लागला. टी-20 मालिका तर 3-0 च्या फरकाने श्रीलंकेच्या हातातून गेली. त्यानंतर एकदिवसीय मालिकाही 2-0 ने गमावल्यानंतर तिसरा सामना रद्द झाला. यावेळी सर्व सामन्या कर्णधार परेरा सलामीला उतरला होता. पण तो काही खास कामगिरी करु शकला नाही.  त्याआधी दिमुथ करुणारत्ने एकदिवसी संघाचा कर्णधार होता. परेराच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेला बांग्लादेशमध्येही पराभव पत्करावा लागला होता.  परेराच्या कर्णधारीखाली श्रीलंका 9 सामन्यांतील केवळ एकच सामना जिंकू शकली आहे.

4 वर्षात 10 वा कर्णधार!

भारताविरुद्धच्या सामन्यांपूर्वी श्रीलंका संघ कर्णधार बदलण्याची शक्यता आहे.  स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संघाचा अष्टैपूलू खेळाडू दासुन शनाकाला कर्णधारपद सोपवण्याची चर्चा आहे.  29 वर्षीय शनाकाने आतापर्यंत श्रीलंका संघासाठी 28 वनडे आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 611 धावांसह 10 विकेट घेतले आहेत.तर टी-20 मध्ये 548 धावांसह 11 विकेट्स पटकावले आहेत. शनाकाला कर्णधार केल्यास 2017 नंतर तो श्रीलंका संघाचा 10 बदललेला कर्णधार असेल.

कर्णधारपदाचा अनुभव

शनाकाने याआधी श्रीलंका संघासाठी कर्णधारपद भूषवलं आहे. 2019 मध्ये पाकिस्तानच्या विरोधात टी-20 मालिकेत त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. अजूनतरी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केलेली नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यात  13 जुलैपासून वनडे आणि 21 जुलैपासून टी-20 सीरीजची सुरुवात होणार आहे.

हे ही वाचा :

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

Sri Lanka Tour : भारतीय संघाचा सराव जोमात सुरु, आपआपसांत सामना खेळून रणनीती मजबूत करण्याचे काम सुरु, पाहा फोटो

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

(For India vs Sri lanka Matches Sri Lanka Cricket Announce Dasun Shanaka As New Captain)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI