AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान संघ आहे की नाटक कंपनी..! इमाम उल हकचा ड्रामा पाहून स्टूअर्ट ब्रॉडचा संताप, म्हणाला..

पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा ड्रामा पाहायला मिळाला. खरं तर ही मालिका पाकिस्तानने गमावली आहे. पण इमाम उल हकचा ड्रामा चर्चेत आला आहे.

पाकिस्तान संघ आहे की नाटक कंपनी..! इमाम उल हकचा ड्रामा पाहून स्टूअर्ट ब्रॉडचा संताप, म्हणाला..
पाकिस्तान संघ आहे की नाटक कंपनी..! इमाम उल हकचा ड्रामा पाहून स्टूअर्ट ब्रॉडने केली पोलखोल, म्हणाला..Image Credit source: Getty Image/Twitter
| Updated on: Aug 31, 2026 | 7:21 PM
Share

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 194 धावांनी धोबीपछाड दिला. या सामन्याच्या दोन्ही डावात इमाम उल हक फलंदाजीला उतरला नाही. दुखापतीचं कारण सांगून त्याने दोन्ही डावात फलंदाजी केली नाही. पण हा बनाव असल्याचं काही लपून राहीलं नाही. एखाद्या चित्रपटातीला भूमिकेला लाजवेल इतका ड्रामा त्याने क्रिकेटच्या मैदानात केला. खरं तर एखाद्या खेळाडूचं प्लेइंग 11 मध्ये खेळण्याचं स्वप्न असतं. पण प्लेइंग 11 मध्ये संधी मिळूनही दोन्ही डावात फलंदाजीला न उतरणं हे आश्चर्यचकीत करणारं आहे. त्यात त्याला झालेली दुखापतही किरकोळ असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे इमाम उल हक आजी माजी क्रिकेटपटूंच्या रडारवर आला आहे. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडने इमामच्या दुखापतीवरून टीकास्त्र सोडलं आहे. इमाम कॅमेरा आणि प्रेक्षकांसमोर नाटकं करत होता, असा आरोप त्याने केला.

झेल सोडल्यानतंर लगेचच दुखापत..

इमाम उल हकने कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गचाळ क्षेत्ररक्षण केलं आणि दोन महत्त्वाचे झेल सोडले. त्यामुळे पाकिस्तानी क्रीडाप्रेमींनी राग व्यक्त केला होता. असं असताना त्याने डाव्या पोटरीला दुखापत झाल्याचा बनाव रचला आणि मैदानाबाहेर गेला. त्यानंतर वैद्यकीय टीमने तपासणी केली आणि कसोटी संपूर्ण सामन्यातून बाद झाल्याचं घोषित केलं. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत पाकिस्तान एक खेळाडू शॉर्ट ठेवून फलंदाजी करावी लागली. त्याच्या गैरहजेरीत संघाचं नुकसान झालं. आघाडीचा फलंदाज खेळत नसल्याचं संघाचं संतुलन बिघडलं ते वेगळं.. त्याचा थेट परिणाम फलंदाजीच्या क्रमवारीवर झाला.

खरं तर वैद्यकीय टीमने तपासणी केल्यानंतर तो खेळणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण चौथ्या दिवशी इमाम उल हक लॉर्ड्सवर डाव्या पोटरीला पट्टी बांधून लंगडत फलंदाजी सराव करताना दिसला. त्यानंतर खऱ्या अर्थाने वाद सुरू झाला. दुसऱ्या डावात संघाला गरज भासली तर तो फलंदाजीला उतरेल असं सांगितलं गेलं. पण त्याची एक्टिंग पाहून स्टूअर्ट ब्रॉड संतापला. ब्रॉड म्हणाला की, ‘हे फक्त दाखवण्यासाठी करत आहे. मीडिया आणि त्याच्यावर सहकाऱ्यांकडून होत असलेली टीका पाहून त्याने हा बनाव रचल्याचं दिसत आहे. जर त्याला सरावच करायचा होता, तर इनडोअर सराव करू शकला असता. सर्वांसमोर हाफ पॅँट घालून पायाला टेप लावून आणि लंगडण्याचं नाटक करण्याची गरज नव्हती. ‘

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट