AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागडं घड्याळ स्वस्तात घेण्याचा मोह Rishabh Pant ला नडला, कोट्यवधी रुपयांची फसवणूक

दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी हुकली. क्रिकेटच्या मैदानावर निराशा हाती लागलेली असतानाच, मैदानाबाहेरही ऋषभ पंतला मोठा झटका बसला आहे.

महागडं घड्याळ स्वस्तात घेण्याचा मोह Rishabh Pant ला नडला, कोट्यवधी रुपयांची फसवणूक
Rishabh pant-Ricky ponting Image Credit source: BCCI
| Updated on: May 24, 2022 | 9:29 AM
Share

मुंबई: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतसाठी IPL 2022 चा शेवट अपेक्षित झाला नाही. अगदी थोडक्यात दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी हुकली. क्रिकेटच्या मैदानावर निराशा हाती लागलेली असतानाच, मैदानाबाहेरही त्याला मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या या विकेटकीपर फलंदाजाला एका घोटाळेबाजाने तब्बल 1.6 कोटी रुपयांना फसवलं. महत्त्वाचं म्हणजे ऋषभची फसवणूक (Rishabh Pant fraud case) करणारा एक क्रिकेटपटूच आहे. ऋषभ पंत आणि त्याच्या मॅनेजरने हरयाणाचा क्रिकेटपटू मृणांक सिंह विरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. मृणांक सिंहला अलीकडेच मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक केली होती. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषभ पंतची फसवणूक करणारा हरयाणाचा माजी क्रिकेटपटू आहे.

एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा आरोप

मागच्या काही काळात त्याने अनेकांनी फसवणूक केली आहे. मृणांक सिंहवर मुंबईच्या एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मृणांक सिंह व्यापारी आणि क्रिकेटपटूंना महागडी घड्याळ, मोबाइल फोन स्वस्तात मिळवून देण्याचं आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करायचा.

महागड्या घड्याळाच्या नादात पंतची मोठी फसवणूक

मृणांक सिंहने मुंबईच्या एका व्यावसायिकाची 6 लाख रुपयांना फसवणूक केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो आर्थररोड कारागृहात बंद आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये आरोपीने ऋषभ पंतलाही असंच आश्वासन दिलं होतं. पंतने दोन महागड्या घड्याळांसाठी त्याला तब्बल 1.63 कोटी रुपये दिले होते. आता ऋषभ पंत आणि त्याचा मॅनेजर पुनीत सोलंकीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर साकेत कोर्टाने आर्थर रोड जेल प्रशासनाला मृणांक सिंहला हजर करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

पंतचं सर्व लक्ष आता मिशन दक्षिण आफ्रिकेवर

IPL 2022 मध्ये ऋषभ पंतला प्रभावी कामगिरी करता आली नाही. पण कटू आठवणी मागे सोडून आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दमदार प्रदर्शन करण्यावर ऋषभ पंतचं सर्व लक्ष असेल. या सीरीजनंतर पंत इंग्लंड दौऱ्यावरही जाणार आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघ एक कसोटी, सहा वनडे आणि टी-20 मॅचही खेळणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.