आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीबाबत गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

विराट कोहलीची बॅट कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही शांत आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातही काही खास करू शकला नाही. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सध्या आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीबाबत गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलं आहे.

आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीबाबत गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 6:21 PM

भारताने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने खिशात घातली. दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसामुळे अडीच दिवसांचा खंड पडला होता. मात्र शेवटच्या दोन दिवसात बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजत मालिका 2-0 ने जिंकली. या मालिकेत टीम इंडियाने बाजी मारली असली तर विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. विराट कोहलीने दोन कसोटी सामन्यातील 4 डावात फक्त 99 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे कसोटीत विराटो कोहलीचं या वर्षात एकही अर्धशतक आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात त्याच्या फॉर्मबाबत चिंता आहे. आता 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. यासाठी विराट कोहली नुकताच लंडनहून परतला आहे. तसेच सराव शिबिरात भाग घेतल्याची माहिती आहे. असं असताना टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीमध्ये अजूनही धावांची भूक आहे आणि तो न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची ताकद असेल, अस वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार गौतम गंभीरने सांगितलं की, “विराट कोहलीमध्ये अजूनही धावांची भूक आहे. आशा आहे की, न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगल्या धावा करेल. एकदा का त्याने लय पकडली तर धावांच्या बाबतीत सातत्यपूर्ण कामगिरी करतो, हे आपण पाहिलं आहे.” विराट कोहलीची कसोटीत बॅट शांत असली तरी सर्वात वेगाने 27 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, गौतम गंभीरने आक्रमक क्रिकेटबाबत टीम इंडियाचं समर्थन केलं. तसेच असाच खेळ भविष्यात पाहायला मिळेल असंही सांगितलं.

प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘भारतीय संघ 100 धावांवर ऑलआउट झाला तरी चालेल, पण आम्ही आक्रमक क्रिकेट खेळणं सोडणार नाही. पण दबाव घेणार नाही. अशा स्थितीतही आम्ही पाय रोवून सामना करू.’ बांगलादेशविरुद्ध भारताच्या या रणनितीचा अंदाच आला आहे. भारताने पहिल्यांदा आक्रमक फलंदाजी केली. मग गोलंदाजीत चांगलं प्रदर्शन करत सामना दोन दिवसात संपवला. या कसोटीत भारताने जलद 100, 150, 200 आणि 250 धावांचा रेकॉर्ड केला होता.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.