GT vs MI Live Score Updates, IPL 2026: बुमराहची कमाल, गुजरातला पहिल्याच बॉलवर झटका

Gujarat Titans vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Live Score and Updates: मुंबई इंडियन्ससमोर गुजरात टायटन्सला रोखून विजयी ट्रॅकवर परतण्याचं दुहेरी आव्हान आहे. मुंबई हे आव्हान पेलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

GT vs MI Live Score Updates, IPL 2026: बुमराहची कमाल, गुजरातला पहिल्याच बॉलवर झटका
GT vs MI Live Score
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 20, 2026 | 9:35 PM

LIVE Cricket Score & Updates

  • 20 Apr 2026 09:35 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : बुमराहची कमाल, गुजरातला पहिल्याच बॉलवर झटका

    मुंबई इंडियन्सने सामन्यातील दुसऱ्या डावाची अप्रतिम सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराह याने डावातील पहिल्याच बॉलवर साई सुदर्शन याला कृष भगत याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 20 Apr 2026 09:20 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : तिलक वर्माचं नाबाद शतक, मुंबईच्या गुजरात विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 199 धावा

    तिलक वर्मा याने मुंबईच्या डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत नाबाद शतक झळकावलं.  यासह मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 199 धावा केल्या आहेत. त्यामुळे गुजरातला विजयासाठी कट टु कट 200 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता मुंबई-गुजरातपैकी कोणता संघ विजयी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 Apr 2026 09:12 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : कॅप्टन हार्दिक आऊट, मुंबईला पाचवा झटका

    मुंबईने कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या रुपात पाचवी विकेट गमावली आहे.  मोहम्मद सिराज याने हार्दिकला 15 रन्सवर आऊट केलं. हार्दिकने 16 चेंडूत ही संथ खेळी केली.

  • 20 Apr 2026 09:05 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : 6,4,4,6,6,0, तिलक वर्माचा कहर, 18 व्या ओव्हरमध्ये 26 धावा

    तिलक वर्मा याने मुंबईच्या डावातील 18 व्या ओव्हरमध्ये अशोक शर्मा याची धुलाई केली. तिलकने या ओव्हरमधील पहिलि्या 5 बॉलमध्ये एकूण 26 धावा जोडल्या. तिलकने पहिल्या 5 चेंडूत 6,4,4,6 आणि 6 अशी फटकेबाजी केली. तर अशोक शर्मा याने शेवटचा बॉल डॉट टाकला.

  • 20 Apr 2026 08:59 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : तिलक वर्माचा झंझावात, 33 चेंडूत अर्धशतक, पलटणला सावरलं

    तिलक वर्मा याने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत मुंबईचा डाव सावरत अर्धशतक झळकावलं आहे. तिलकने षटकार ठोकून 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. तिलकचं 19 व्या मोसमातील हे पहिलवहिलं अर्धशतक ठरलं आहे.

  • 20 Apr 2026 08:47 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : तिलक वर्माची फटकेबाजी, सोबतीला कॅप्टन हार्दिक, मुंबई किती धावा करणार?

    तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनी 15 ओव्हरपर्यंत मुंबईला 4 आऊट 122 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. तिलक वर्मा 36 तर हार्दिक 4 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे मुंबई शेवटच्या 30 बॉलमध्ये किती धावा जोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 Apr 2026 08:31 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : सेट नमन धीर आऊट, मुंबईला चौथा झटका, पलटण पुन्हा बॅकफुटवर

    प्रसिध कृष्णा याने सेट नमन धीर याला आऊट करत मुंबईला चौथा झटका दिला आहे. प्रसिधने नमनला कगिसो रबाडा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.  नमनने 32 बॉलमध्ये 45 रन्स केल्या.

  • 20 Apr 2026 08:04 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : मुंबईला तिसरा झटका, सूर्यकुमार यादव आऊट, रबाडाचा कहर

    वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने मुंबईच्या टॉप ऑर्डरचं कंबरडं मोडलं आहे. रबाडाने दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक याच्यानंतर आता सूर्यकुमार यादव याला आऊट करत मुंबईला तिसरा झटका दिला आहे. सूर्यकुमार यादव याने पुन्हा पलटणची निराशा केली. सूर्या 15 धावांवर आऊट झाला.

  • 20 Apr 2026 07:50 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates, IPL 2026 : मुंबईला दुसरा झटका, क्विंटन डी कॉक आऊट, सलामी जोडी माघारी

    कगिसो रबाडा याने मुंबईला 2 झटके देत सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. रबाडाने डेब्यूटंट दानिश मालेवार याच्यानंतरत क्विंटन डी कॉक याला आऊट केलं. क्विंटननंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे.

  • 20 Apr 2026 07:39 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : मुंबईला पहिला झटका, डेब्यूटंट दानिश मालेवार 2 धावांवर आऊट

    गुजरातने मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. कगिसो रबाडा याने मुंबईच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर डेब्यूटंट दानिश मालेवार याला 2 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे.

  • 20 Apr 2026 07:33 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : सामन्याला सुरुवात, मुंबईची बॅटिंग, क्विंटन-दानिश सलामी जोडी मैदानात

    गुजरात टायन्टस विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि डेब्यूटंट दानिश मालेवार ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 20 Apr 2026 07:11 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.

  • 20 Apr 2026 07:11 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन

    गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा आणि अशोक शर्मा.

  • 20 Apr 2026 07:06 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : गुजरातने टॉस जिंकला, कॅप्टन शुबमनचा बॉलिंगचा निर्णय

    गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन शुबमन गिल याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 20 Apr 2026 06:37 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : गुजरात-मुंबई सामना, थोड्याच वेळात टॉस

    गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यातील टॉस थोड्याच वेळात होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार आहे. या सामन्यात कुणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 Apr 2026 06:22 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : गुजरात टायटन्स टीम

    शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, राशिद खान, अशोक शर्मा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज,
    प्रसीध कृष्ण, शाहरुख खान, इशांत शर्मा, जयंत यादव, जेसन होल्डर, ल्यूक वुड, आर साई किशोर, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, मानव सुथार, कुमार कुशाग्र, अर्शद खान, गुरनूर ब्रार, निशांत सिंधू आणि कॉनर एस्टरहुझेन.

  • 20 Apr 2026 06:18 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शेरफेन रुदरफोर्ड, नमन धीर, मयंक रावत, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश, मिचेल सँटनर, अश्वनी कुमार, विल जॅक्स, मयंक मार्कंडे, रघु शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, एएम गझनफर, दानिश मलेवार, क्रिश भगत आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

  • 20 Apr 2026 06:10 PM (IST)

    GT vs MI Live Updates, IPL 2026 : गुजरात-मुंबई आमनेसामने, कोण जिंकणार?

    गुजरात टायटन्स आयपीएल 2026 स्पर्धेतील आपल्या सहाव्या सामन्यात घरच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्ससमोर आपल्या मोहिमेतील सहावा आणि आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील 30 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. गुजरातचाही हा सहावा सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. गुजरातने आतापर्यंत 5 पैकी एकूण आणि सलग 3 सामने जिंकलेत. तर मुंबईला 5 पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे मुंबईसमोर या सामन्यात गुजरातला पराभूत करत विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Follow Us