Happy Birthday Wasim Jaffer : दुसऱ्याच फर्स्ट क्लास सामन्यात त्रिशतक, 10 रणजी करंडक जिंकणाऱ्या क्रिकेटपटूचा आज वाढदिवस

देशांतर्गत क्रिकेटचा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणून ओळखला जाणारा वसीम जाफर (Wasim Jaffer) आज (16 फेब्रुवारी) आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1978 मध्ये मुंबईत जन्मलेला वसीम जाफरने रणजीसह (Ranji Trophy) विजय हजारे ट्रॉफीमध्ये खोऱ्याने धावा जमवल्या आहेत.

Happy Birthday Wasim Jaffer : दुसऱ्याच फर्स्ट क्लास सामन्यात त्रिशतक, 10 रणजी करंडक जिंकणाऱ्या क्रिकेटपटूचा आज वाढदिवस
Wasim Jaffer
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 12:00 AM

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटचा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणून ओळखला जाणारा वसीम जाफर (Wasim Jaffer) आज (16 फेब्रुवारी) आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1978 मध्ये मुंबईत जन्मलेला वसीम जाफरने रणजीसह (Ranji Trophy) विजय हजारे ट्रॉफीमध्ये खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये 2017-18 आणि 2018-19 मध्ये विदर्भच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड्सचा विचार केला तर सचिन तेंडुलकरचा उल्लेख नक्कीच केला जातो. त्याचप्रमाणे भारतीय देशांतर्गत क्रिकेट वसीम जाफरशिवाय अपूर्ण आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वसीमच्या नावावर तब्बल 57 शतकं आहेत. त्यातली 36 शतकं त्याने रणजी ट्रॉफीमध्ये झळकावली आहेत. जाफरने 1996 मध्ये पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्याने 260 प्रथम श्रेणी सामने आणि 118 लिस्ट ए सामने खेळले आहेत. लिस्ट ए सामन्यात त्याच्या नावावर 4849 धावा आहेत. त्यात त्याने 10 शतकं आणि 33 अर्धशतकं झळकावली आहेत.

जाफर 1996-97 ते 2012-13 दरम्यान आठ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबई संघाचा भाग होता आणि त्यानंतर त्याने विदर्भाला सलग दोन वेळा (2018 आणि 2019) विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2019 च्या मोसमात त्याने 11 सामन्यात 4 शतके ठोकली आणि 69.13 च्या सरासरीने 1037 धावा फटकावल्या होत्या.

दुसऱ्याच प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक

जाफरने 2000 साली आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावून भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना फेब्रुवारी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि या सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून 10 धावा (6 आणि 4) केल्या. कसोटीतील पहिले शतक झळकावण्यासाठी त्याला 6 वर्षे वाट पाहावी लागली. मात्र, त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19,410 धावा

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 260 सामने खेळून जाफरने सुमारे 19,410 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 57 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत. त्याचवेळी 150 रणजी सामने खेळणारा वसीम पहिला खेळाडू आहे आणि त्याच्या नावावर 12 हजारांहून अधिक धावा आहेत. हा भारतीय विक्रम आहे.

31 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतीनिधीत्व

विदर्भासाठी रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या जाफरने 2000 ते 2008 दरम्यान भारतासाठी 31 कसोटी सामने खेळले आणि 1944 धावा केल्या, ज्यात पाच शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी दोन एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.

इतर बातम्या

IPL 2022 : IPL मध्ये त्याला कोणी विचारलं नाही, अखेर ‘त्या’ सौंदर्यवतीने समोर येऊन दिलं उत्तर, कोण आहे ‘ती’

IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर

IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.