AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला माफ करा…! हॅरी ब्रूक इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या तपासात दोषी, झालं असं की…

इंग्लंड संघाचा वनडे आणि टी20 कर्णधार हॅरी ब्रूक अडचणीत सापडला आहे. त्याने केलेल्या गुन्ह्यात दोषी आढळला असून त्याच्यावर 36 लाखांचा दंड ठोठावला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मला माफ करा...! हॅरी ब्रूक इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या तपासात दोषी, झालं असं की...
मला माफ करा...! हॅरी ब्रूक इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या तपासात दोषी, झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Jan 08, 2026 | 4:31 PM
Share

एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडची लाज गेली आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने गमवावा लागला आहे. त्यामुळे इंग्लंडची संपूर्ण जगात नाचक्की झाली आहे. असं असताना आणखी एका स्टार खेळाडूच्या वर्तनामुळे मान खाली घालावी लागत आहे. हॅरी ब्रूकने एका बारमध्ये मारहाण केल्याची घटना घडली आहे. बाउंसरला मारहाण केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. एशेज कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यावेळी हॅरी ब्रूकचा न्यूझीलंडमध्ये एका बाउंसरशी वाद झाला होता. ही घटना न्यूझीलंड दौऱ्यातील शेवटच्या सामन्याच्या काही तासाआधी घडली होती. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, वेलिंगटनमध्ये तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी ब्रूकला नाइट क्लबमध्ये जाऊ दिलं नाही. तेव्हा त्याने खूप दारू प्यायली होती. त्यानंतर त्याचं बाउंसरशी वाद झाला. आश्चर्य म्हणजे या घटनेची माहिती स्वत: हॅरी ब्रूकने संघाला दिली आणि त्यात आता दोषी आढळला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हॅरी ब्रूक सखोल चौकशी केली आणि त्यात दोषी आढळला आहे. या प्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 30 हजार पौंड म्हणजेच 36 लाखांचा दंड ठोठावला आहे. पण असं असलं तरी वनडे आणि टी20 संघाचं कर्णधारपद कायम ठेवलं आहे. ब्रूकला केलेल्या प्रकाराचा पश्चाताप झाला असून त्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाची माफी देखील मागितली आहे. त्याने माफीनामा देताना सांगितलं की, ‘इंग्लंडसाठी खेळणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी हे गंभीररित्या पाहात आहे. माझ्या सहकाऱ्यांना, प्रशिक्षक आणि समर्थकांना निराश केल्याने मला त्याचं वाईट वाटत आहे. मी माझ्या कृत्याबद्दल माफी मागतो. माझे वागणं चुकीचे होते आणि इंग्लंड संघाला याचा फटका बसला, म्हणून मी मनापासून माफी मागतो. यापुढे असं कधीच घडणार नाही याची काळजी घेईन.’

हॅरी ब्रूकच नाही तर इंग्लंडच्या इतर खेळाडूंनीही अशा लाजिरवाण्या घडामोडींनी लक्ष वेधून घेतलं आहे. एशेज कसोटी मालिकेदरम्यान बेन डकेटने क्षमतेपेक्षा मद्य प्राशन केलं होतं. रिपोर्टनुसार, काही खेळाडू संपूर्ण दौऱ्यात क्षमतेपेक्षा जास्त मद्य प्राशन करत होते. नूसातील बेन डकेटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात दारूच्या नशेत घरी जाण्याच्या स्थितीत नव्हता. इंग्लंडच्या इतर खेळाडूंनीही मैदानाबाहेर केलेल्या अशा कृत्यांनी क्रिकेट बोर्डाची मान खाली घातली आहे. खेळाडूंच्या या कृतीचा फटका मैदानाबाहेर आणि मैदानातही बसताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 0-3ने आणि आता एशेज मालिका 1-4 ने गमावली आहे.

बॅलेट पेपरवर निवडणुका होणार? मागणी करत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका होणार? मागणी करत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले....
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण.
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात...
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात....
कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यानाच नवनीत राणांवर डाऊट?
कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यानाच नवनीत राणांवर डाऊट?.
सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा भेटी, नव्या प्रचार पॅटर्नची होतेय चर्चा
सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा भेटी, नव्या प्रचार पॅटर्नची होतेय चर्चा.
अंबरनाथमध्ये पाठिंब्याला विरोध तरीही पूर्ण काँग्रेसच भाजपात!
अंबरनाथमध्ये पाठिंब्याला विरोध तरीही पूर्ण काँग्रेसच भाजपात!.
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले.
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका.