AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE : तिसऱ्या टी20 सामन्यात कशी असेल प्लेइंग इलेव्हन? कोणते खेळाडू ठरतील वरचढ? पिच रिपोर्ट जाणून घ्या

IND vs IRE 3rd T20 : तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताचं पारडं जड असेल. पण कोणते खेळाडू बाजी ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

IND vs IRE : तिसऱ्या टी20 सामन्यात कशी असेल प्लेइंग इलेव्हन? कोणते खेळाडू ठरतील वरचढ? पिच रिपोर्ट जाणून घ्या
IND vs IRE : तिसऱ्या टी20 सामन्यात कसं असेल पिच? कोणते खेळाडू ठरतील लकी? सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर
| Updated on: Aug 22, 2023 | 4:18 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने मालिका खिशात घातली आहे. दुसऱ्या सामना भारताने 33 धावांनी जिंकला. या सामन्यात ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि रिंकू सिंह यांनी फलंदाजीत कमाल केली. तर जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिष्णोई यांनी गोलंदाजीत दाणादाण उडवून दिली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. असं असलं तरी आयर्लंडकडून अँडी बॅलबिर्नी 51 धावा आणि मॅककार्थी याने दोन गडी बाद केले होत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिल्या दोन सामन्यात काही खेळाडू चमकले. तर काही खेळाडूंनी हवी तशी कामगिरी केलेली नाही. तिसऱ्या सामन्यात कोणत्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळेल आणि कोणत्या खेळाडूला संधी मिळेल याबाबत उत्सुकता आहे.

पिच रिपोर्ट

आयर्लंडमध्ये सध्या थंड वातावरण असून तापमान 16 अंश सेल्सिअस असणार आहे. आर्द्रता 75 टक्क्यांपर्यंत असेल. हवेचा वेग ताशी 14 किमी असू शकतो. असं असलं तरी डब्लिन पिच फलंदाजीसाठी पूरक आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही फलंदाजांना मदत होणार आहे. काही अंशी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत होईल. फिरकीपटूंना या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं जाईल. दुसरीकडे, हवामान ढगाळ राहील आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

प्रथम फलंदाजी करणारा संघ 170 पर्यंत धावा करू शकतो. तर या मैदानावर विजयी धावांचा पाठलाग करणं सोपं नाही. विजयी धावा गाठण्याची टक्केवारी 40 टक्क्यांपर्यंत आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 7 सामने झाले असून सर्व सामने टीम इंडियानेच जिंकले आहेत. आता मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकल्यास आयर्लंडला व्हाइटवॉश मिळणार आहे.

तिसऱ्या टी 20 सामन्यात हे खेळाडू वरचढ ठरू शकतात

टीम-1

विकेटकीपर- संजू सॅमसन (कर्णधार) फलंदाज- ऋतुराज गायकवाड,अँडी बॅलबिर्नी, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा (उपकर्णधार), पॉल स्टिर्लिंग अष्टपैलू- कर्टिस कॅम्पर, वॉशिंग्टन सुंदर गोलंदाज- जसप्रीत बुमराह, रवि बिष्णोई, बेन मॅककार्थी

टीम-2

विकेटकीपर- संजू सॅमसन फलंदाज- ऋतुराज गायकवाड, अँडी बॅलबिर्नी (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, पॉल स्टिर्लिंग अष्टपैलू- कर्टिस कॅम्पर गोलंदाज- जसप्रीत बुमराह (कर्णधार), क्रेग यंग, रवि बिष्णोई, मॅककार्थी

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.