AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा झटका, बुमराह इतक्या सामन्यांना मुकणार, निवड समिती अध्यक्ष म्हणाले…

Ajit Agarkar On Jasprit Bumrah : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यासह टीम इंडियाला झटकाही लागला आहे. मॅचविनर बॉलर जसप्रीत बुमराह याला इंग्लंड विरुद्ध सर्व सामने खेळता येणार नसल्याचं स्पष्ट केलं.

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा झटका, बुमराह इतक्या सामन्यांना मुकणार, निवड समिती अध्यक्ष म्हणाले...
Team India Jasprit BumrahImage Credit source: jasprit bumrah x account
| Updated on: May 24, 2025 | 3:32 PM
Share

बीसीसीआय निवड समिताने आज 24 मे रोजी आगामी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी या खेळाडूची नावं सांगितली. तसेच शुबमन गिल याची टेस्ट कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याला उपकर्णधार करण्यात आलं आहे.आगरकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही घोषणा केली. तसेच आगरकर यांनी टीम इंडियाचा प्रमुख आणि मॅचविनर बॉलर जसप्रीत बुमराह याच्याबाबत मोठी अपडेट दिली.

टीम इंडियाला 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. टीम इंडिया या मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 साखळीची सुरुवात करणार आहे. मात्र त्याआधी आगरकर यांनी टीम इंडियासाठी चिंताजनक अपडेट दिली आहे. बुमराह या मालिकेतील सर्व सामने खेळू शकणार की नाही? याबाबत शंका आहे. तसेच बुमराह 3 सामने खेळणार की 4? हे काळच ठरवेल”, असं आगरकरने सांगितलं.

अजित आगरकर काय म्हणाले?

“मला वाटत नाही की बुमराह पाचही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल”, असं आगरकर यांनी म्हटलं. बुमराहने संघ जाहीर करण्याआधीच पाचही सामने खेळण्यासाठी सक्षम नसल्याचं बीसीसीआयला कळवलं होतं. बुमराहने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सर्व सामने खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता आगरकर यांनी संघ जाहीर केल्यानंतर बुमराहबाबत अपडेट दिली.

जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. बुमराहने टीम इंडियाला आतापर्यंत अनेकदा सामने जिंकून दिले आहेत. बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमधील सर्व 5 सामने खेळला होता. मात्र बुमराहला सिडनीत झालेल्या पाचव्या सामन्यात दुखापत झाली होती.

बुमराहला दुखापतीमुळे सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात बॉलिंग करता आली नाही. बुमराहला पाठीत सूज आली होती. बुमराहवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे बुमराहला क्रिकेटपासून काही महिने दूर रहावं लागलं होतं. तसेच बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकावं लागलं होतं. त्यामुळे बुमराहने खबरदारी म्हणून इंग्लंड दौऱ्यात सर्व सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आगरकर यांनीही त्याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता बुमराह या मालिकेत किती सामने खेळणार? हे तेव्हाच स्पष्ट होईल.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.