PAK vs NZ : विल यंग-टॉम लॅथमची शतकी खेळी, गोलंदाजांची जोरदार धुलाई, पाकिस्तानसमोर 321 धावांचं आव्हान
Icc Champions Trophy 2025 : विल यंग आणि टॉम लॅथम या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध 320 धावा केल्या आहेत. आता पाकस्तानन 321 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत.

न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात 300 पार मजल मारली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध शानदार बॅटिंग केली. न्यूझीलंडने 320 धावांचा डोंगर उभा केला आहे. न्यूझीलंडसाठी 2 फलंदाजांनी शतक झळकावलं. तर एकाने अर्धशतक करत दोघांना चांगली साथ दिली.मात्र इतरांना काही खास योगदान देता आलं नाही. विल यंग आणि त्यानंतर टॉम लॅथम याने शतक केलं. तर ग्लेन फीलिप्स याने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 300 पार पोहचता आलं. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 320 धावा केल्या. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली आहे. त्यानंतर आता गोलंदाजांसमोर या 321 धावांचा यशस्वी बचाव करण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान पाकिस्तानने अनेकदा 300 पेक्षा अधिक धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. त्यामुळे आता या सामन्याचा काय निकाल लागतोय? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
न्यूझीलंडची बॅटिंग
पाकिस्तानने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि केन विलियमसन मागोमाग आऊट झाले. कॉनव्हेने 10 आणि केनने 1 धावा केली. दोघे आऊट झाल्याने न्यूझीलंडची स्थिती 2 बाद 40 अशी झाली. त्यानंतर डॅरेल मिचेल 10 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे न्यूझीलंडचा स्कोअर 3 आऊट 73 असा झाला. त्यानंतर विल यगं, टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स या त्रिकुटाने गेम फिरवला.
विल यंग आणि टॉम लॅथम या दोघांनी शतकी खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने अर्धशतक केलं. विलने 113 बॉलमध्ये 107 रन्स केल्या. टॉम लॅथमने 118 धावा जोडल्या. तर ग्लेन फिलिप्सने 61 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरीस रौफ या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अब्रार अहमदने 1 विकेट मिळवली.
न्यूझीलंडच्या 320 धावा
A 118-run fourth-wicket stand between Will Young (107) and Tom Latham (118*) followed by a 125-run fifth-wicket stand between Latham and Glenn Phillips (61) highlight a strong start with the bat in Karachi. Catch-up on all scores | https://t.co/SJnArKy9sU 📲 #ChampionsTrophy pic.twitter.com/fthd0lDlP7
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2025
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्के.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.