IND vs AUS SF Toss : ऑस्ट्रेलियाने निर्णायक सामन्यात टॉस जिंकला, टीम इंडियाविरुद्ध बॅटिंग
India vs Australia SF Toss Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भिडणार आहेत.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने पार पडले आहे. त्यानंतर आजपासून (4 मार्च) उपांत्य फेरीला सुरुवात होत आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. तर कर्णधार रोहित शर्मा याची टॉस गमावण्याची ही सलग चौदावी वेळ ठरली आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
ऑस्ट्रेलियाने या महत्त्वाच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत.दुखापतीमुळे बाहेर झालेला ओपनर मॅथ्यू शॉर्ट याच्या जागी कूपर कॉनोली याचा समावेश करण्यात आला आहे. तर स्पेन्सर जॉन्सन याच्या जागी तनवीर सांघा याचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने टॉसदरम्यान ही माहिती दिली. तर टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन अनचेंज असल्याचं रोहित शर्माने स्पष्ट केलं.
ट्रेव्हिस हेडला रोखण्याचं आव्हान
ऑस्ट्रेलियाची पहिले बॅटिंग असल्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याला रोखण्याचं आव्हान असणार आहे. याच हेडने वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये शतकी खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. तसेच टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतही हेडने झंझावाती खेळी केली होती. मात्र टीम इंडियाने ऐन क्षणी हेडला रोखण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे आताही या हेडला झटपट गुंडाळण्याचं आव्हान भारतासमोर असणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss News 🚨
Australia have elected to bat against #TeamIndia in the #ChampionsTrophy Semi-Final!
Updates ▶️ https://t.co/HYAJl7biEo#INDvAUS pic.twitter.com/tdkzvwJfyu
— BCCI (@BCCI) March 4, 2025
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा आणि तनवीर संघा.
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
