AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीने विराट कोहलीच्या 722 दिवसांचा घातला घोळ, लक्षात येताच चूक सुधारली

विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्या केलेल्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा नंबर 1 स्थान गाठलं आहे. आयसीसीने बुधवारी या बाबतची घोषणा केली. त्यानंतर आयसीसीची चूक पाहून नेटकऱ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे आयसीसीला उपरती झाली आणि चूक सुधारली.

आयसीसीने विराट कोहलीच्या 722 दिवसांचा घातला घोळ, लक्षात येताच चूक सुधारली
आयसीसीने विराट कोहलीच्या 722 दिवसांचा घातला घोळ, लक्षात येताच चूक सुधारलीImage Credit source: PTI
| Updated on: Jan 15, 2026 | 10:22 PM
Share

Virat Kohli Time Periods as No.1 Ranked ODI Batter: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. रोहित शर्माला मागे टाकत त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने 93 धावांची खेळी केली होती. तेव्हाच विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान होईल हा अंदाज बांधला गेला होता. आयसीसीने बुधवारी वनडे क्रमवारी जाहीर केली आणि तसंच झालं. विराट कोहली वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान झाला. जवळपास चार वर्षांनी विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये पहिलं स्थान पटकावलं. यापूर्वी विराट कोहली 2021 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर होता. विराट कोहलीने 2013 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा अव्वल स्थान गाठलं होतं. त्यानंतर क्रमवारीत चढउतार पाहायला मिळाले. पण आता पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. असं असताना आयसीसीने याबाबतची घोषणा करताना चूक केली.

विराट कोहली वनडे कारकि‍र्दीत एकूण 1547 दिवस अव्वल स्थानी होता. विराट कोहली सलग 1257 दिवस वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर होता.त्यांने हा कारनामा 2017 ते 2021 दरम्यान केला होता. भारतीय फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक काळ पहिल्या स्थानावर विराजमान असणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद आहे. तर जगातील तिसरा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स पहिल्या क्रमांकावर आहे. क्रिकेट कारकिर्दीतील एकूण 2306 दिवस टॉपला होता.

क्रमवारीची घोषणा करताना आयसीसीने विराट कोहली 825 दिवस पहिल्या स्थानावर होता असं लिहिलं. पण हा आकडा 1547 होता. म्हणजेच विराटच्या एकूण 722 दिवस कापले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर गोंधळ घातला. आयसीसीला टॅग करून जाब विचारला. त्यानंतर आयसीसीला उपरती झाली आणि त्यांनी चूक सुधारली. आयसीसीने लिहिलं की, “भारताचा माजी कर्णधार ऑक्टोबर 2013 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. त्याने एकूण 1547 दिवस पहिल्या क्रमांकावर घालवले आहेत. जे कोणत्याही भारतीय फलंदाजाने सर्वाधिक आहे. तो सर्वकालीन यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, यात वेस्ट इंडिजचा महान फलंदाज विव रिचर्ड्स अव्वल स्थानावर आहे, त्याने 2306 दिवस अव्वल स्थानावर विराजमान राहिला होता.”

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.