AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC ODI Ranking : टॉप 10 मध्ये फिरकीपटूंचा दबदबा, 9 स्पिनर्स आणि एक वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. गोलंदाजांच्या यादीत टॉप 10 मध्ये फिरकीपटूंचा समावेश आहे. भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश असून बुमराह टॉप 10 मधून बाहेर आहे.

ICC ODI Ranking : टॉप 10 मध्ये फिरकीपटूंचा दबदबा, 9 स्पिनर्स आणि एक वेगवान गोलंदाज
ICC ODI Bowlers Ranking : टॉप 10 मध्ये फिरकीपटूंचा दबदबा, 9 स्पिनर्स आणि एक वेगवान गोलंदाज Image Credit source: BCCI
| Updated on: Aug 20, 2025 | 5:04 PM
Share

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही वनडे सामना खेळलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाला वनडे क्रिकेट खेळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढच्या महिन्यातही भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत टी20 फॉर्मेटमध्ये खेळणार आहे. त्यामुळे भारताची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे. आता भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. अशा स्थितीत आयसीसीकडून वनडे गोलंदाजांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवल्याचं दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेच्या फिरकीपटू केशव महाराज या यादीत टॉपला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने 33 धावा देत पाच गडी बाद केले होते. त्याचं फळ त्याला आयसीसी क्रमवारीत मिळालं आहे. केशव महाराज या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. याआधी 2023 मध्ये वनडे क्रिकेट क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. दोन वर्षानंतर केशव महाराज नंबर वन झाला आहे.

केशव महाराजने श्रीलंकेचा फिरकीपटू महेश तिक्षाणाला मागे टाकलं आहे. केशव महाराजचे 687 रेटिंग गुण आहेत. तर तिक्षाणाचे रेटिंग गुण हे 671 इतके असून दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आहे. त्याच्या खात्यात 650 गुण आहेत. नामिबियाचा फिरकी गोलंदाज बर्नार्ड स्कोल्झ चौथ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज पाचव्या स्थानावर आहे आणि न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सॅटनर सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री सातव्या स्थानावर आहे. हा एकमेव गोलंदाज वगळता सर्व फिरकी गोलंदाज आहेत.

श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा 619 रेटिंग गुणांसह आठव्या स्थानावर आहे. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा 616 रेटिंग गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.ऑस्ट्रेलियाचा अॅडम झांपा दहाव्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग गुण हे 608 आहेत. या यादीत पाकिस्तानचा कोणताही गोलंदाज टॉप-१० मध्ये स्थान मिळवू शकला नाही. तर मोहम्मद शमी 596 गुणांसह 13व्या, जसप्रीत बुमराह 595 गुणांसह14व्या आणि मोहम्मद सिराज 593 गुणांसह 15 व्या स्थानावर आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.