World Cup 2023 Live Streaming | वर्ल्ड कपमधील सर्व सामने फुकटात पाहता येणार, जाणून घ्या

Icc World Cup 2023 Live Match Watch In Free | आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वर्ल्ड कपमधील सर्व सामने फुकटात पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणीत झाला आहे.

World Cup 2023 Live Streaming | वर्ल्ड कपमधील सर्व सामने फुकटात पाहता येणार, जाणून घ्या
यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असल्यामुळे भारतीय संघाला विजेतेपडदाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाचा आताचा फॉर्म पाहता कोणत्याही संघाला भारताला पराभूत करणं जडच असणार आहे.
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 1:44 AM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कपला गुरुवार 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा गतविजेता विरुद्ध उपविजेता यांच्यात होणार आहे. या पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हे संघ आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेत 2 सेमी फायनल, 1 फायनल आणि 45 साखळी असे एकूण 48 सामने 45 दिवसात पार पडणार आहेत. सलामी आणि अंतिम सामना हा गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. वर्ल्ड कपमधील एकूण 48 सामने हे मुंबई , पुण्यासह एकूण 10 शहरांमध्ये सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने क्रिकेट चाहत्यांना फुकटात पाहायला मिळणार आहेत. हे सामने फुकटात कसे पाहता येतील, हे आपण जाणून घेऊयात.

भारतात होणाऱ्या सर्व सामने टीव्हीवर दाखवण्याचे अधिकार हे अनिल अंबानी यांच्या वायकॉम 18 ग्रुपकडे आहेत. त्यानुसार टीव्ही आणि डिजीटल राईट्स हे वायकॉम ग्रुपकडे आहेत. त्यामुळे भारतात होणाऱ्या सर्व सामने हे आता स्पोर्ट्स 18 या चॅनेलवर आणि जिओ सिनेमा या एपवर पाहायला मिळतील. मात्र आयसीसी आणि भारताबाहेर होणाऱ्या सर्व सामन्यांचे टीव्ही राईट्स अजून स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत.

त्यामुळे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध भाषांमधील चॅनेलवर सशुल्क पाहता येतील. मात्र हे सामने मोबाईलवर फुकटात पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागणार आहे. आधी डिज्नी प्लस हॉटस्टारवर सामने पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. मात्र जिओ सिनेमानंतर डिज्नी प्लस हॉटस्टारने सामने फुकटात दाखवण्याचा निर्णय घेत प्रेक्षकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान टीम इंडिया या वर्ल्ड कपमध्ये मुंबईतील वानखेडे, पुण्यातील एमसीएच्या गहुंजेसह एकूण 9 स्टेडियमध्ये सामने खेळणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांचं सर्वात जास्त लक्ष हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 14 ऑक्टोबरला होणाऱ्या टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे असणार आहे.

आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Non Stop LIVE Update
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.