AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022 ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

ICC T20 World Cup 2022 Full Schedule: ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच वेळापत्रक जारी झालं आहे. यंदाचा टी-20 वर्ल्डकप (T-20 World cup) ऑस्ट्रेलियात होणार आहे.

ICC T20 World Cup 2022 Full Schedule: T-20 वर्ल्डकप 2022  'या' दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IND vs PAK
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 7:18 AM
Share

ICC T20 World Cup 2022 Full Schedule: ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच वेळापत्रक जारी झालं आहे. यंदाचा टी-20 वर्ल्डकप (T-20 World cup) ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच (Australia) विद्यमान टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन आहे. प्रत्येक वर्ल्डकप स्पर्धेत कोट्यवधी चाहत्यांना प्रतिक्षा असते, ती भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची. 2022 वर्ल्डकप मध्येही भारत-पाकिस्तान भिडणार आहेत.

‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान आयसीसीने शुक्रवारी सकाळी नवीन शेड्युलड जारी केलं. टी-20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सुपर-12 राऊंडची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होईल. सुपर-12 मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या लढती – भारत विरुद्ध पाकिस्तान 23 ऑक्टोबर – मेलबर्न – भारत विरुद्ध ग्रुप ए रनर अप 27 ऑक्टोबर – सिडनी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 30 ऑक्टोबर – पर्थ – भारत विरुद्ध बांगलादेश 2 नोव्हेंबर – एडिलेड – भारत विरुद्ध ग्रुप बी विनर 6 नोव्हेंबर – मेलबर्न

टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि दोन क्वालिफायर टीमसोबत ग्रुप-2 मध्ये ठेवले आहे. टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. यावेळी पाकिस्तानने दहा विकेटने भारतावर विजय मिळवला होता. त्यावेळी वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते.

फायनल किती तारखेला? टी-20 वर्ल्कप स्पर्धेची सुरुवात 16 ऑक्टोबर रविवारपासून होणार आहे. फायलन 13 ऑक्टोबर रविवारी होणार आहे. एकूण 16 टीम्स या वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार असून ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली स्वप्न साकार होईल? 2021 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकला नव्हता. पाकिस्तान, न्यूझीलंड या संघांकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावर्षी पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानकडून भारत पराभूत झाला होता. आता भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हाती आहे. विराट कोहली तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार नाहीय. रोहित शर्मा टी-20 आणि वनडे संघाचा कर्णधार आहे.

संबंधित बातम्या: Road Safety World Series च्या आयोजकांनी सचिन तेंडुलकरचे पैसे खाल्ले, मास्टर ब्लास्टरने घेतला मोठा निर्णय

Virat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड

IND vs SA, 2nd ODI: संघात स्थान मिळवण्यासाठी दोन मुंबईकरांमध्ये स्पर्धा, असा असू शकतो भारतीय संघ

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.