AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Ranking: आयसीसी क्रमवारीत उलथापालथ, हेडने अव्वल स्थान गमावलं! गिल-जयस्वाल कोणत्या स्थानी?

दर आठवड्यातील सामन्यांचा लेखाजोखा घेऊन आयसीसी बुधवारी फलंदाजांची क्रमवारी जाहीर करत असते. मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया बांग्लादेश पार पडला. तर श्रीलंका भारत सामना सुरू होता. त्यामुळे क्रमवारीत उलथापालथ होऊ शकते.

ICC Ranking: आयसीसी क्रमवारीत उलथापालथ, हेडने अव्वल स्थान गमावलं! गिल-जयस्वाल कोणत्या स्थानी?
ICC Ranking: आयसीसी क्रमवारीत उलथापालथ, हेडने अव्वल स्थान गमावलं! गिल-जयस्वाल कोणत्या स्थानी? Image Credit source: PTI
| Updated on: Aug 19, 2026 | 4:33 PM
Share

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कसोटी क्रमवारीत अपडेट केले आहेत. मागच्या आठवड्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे त्याचा परिणाम क्रमवारीवर दिसणं सहाजिकच होतं. फलंदाजांच्या क्रमावारीत त्याचा प्रभाव दिसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात ट्रेव्हिस हेड फेल गेला होता. त्यामुळे त्याचं क्रमवारीतील अव्वल स्थान गेलं आहे. इतकंच काय तर त्याची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. हॅरी ब्रूकची रेटिंग 852 इतकी झाली आहे. जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांना थोडासा फायदा झाला आहे. जो रूटला क्रमवारीत एक स्थानाचा लाभ झाला आहे. 840 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 833 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ट्रेव्हिस हेडचं मोठं नुकसान

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडची कामगिरी हवी तशी झाली नाही. पहिल्या डावात 22 आणि दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीचा त्याला क्रमवारीत फटका झाला. दुसरीकडे, हॅरी ब्रूकने न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या मालिकांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि मोठ्या धावसंख्येमुळे त्याचे रेटिंग पॉईंट्स झपाट्याने वाढले होते. त्यात ट्रेव्हिस हेडची कामगिरी निराशाजनक झाल्याने रेटिंग घसरलं. ट्रेव्हिस हेडचं रेटिंग 819 पर्यंत पोहोचली. त्यामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दक्षिण अफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेम्बा बावुमा 775 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

भारतीय फलंदाजांची क्रमवारीतील जागा तशीच

भारतीय फलंदाजांच्या क्रमवारीत काहीच बदल झालेला नाही. भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याची रेटींग 743 इतकी असून सातव्या स्थानावर आहे. यशस्वी जयस्वाल 733 रेटिंगसह नवव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम 716 रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे. ही रेटिंग 18 ऑगस्टपर्यंत जारी जारी करण्यात आली आहे. भारत श्रीलंका सामन्याचा निकाल लागल्याने पुढच्या आठवड्यात या क्रमवारीत बदल होण्याची दाट शक्यता आहे. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांना नुकसान होऊ शकतं. कारण दोघंही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत फेल गेले आहेत.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर