Video : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला धार
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची संपूर्ण जगात चर्चा आहे. त्याची शैली आणि अचूक टप्पा यामुळे त्याचा सामना करणं कठीण आहे. अशी शैली प्रत्येकाला मिळणं कठीण आहे. पण त्याच्या सारखी जवळपास शैली असलेली एक गोलंदाज ऑस्ट्रेलियन वुमन्स संघाला मिळाली आहे.

अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत एका गोलंदाजाने लक्ष वेधून घेतलं आहे. तिची गोलंदाजीची शैली जवळपास जसप्रीत बुमराहसारखी आहे. ऑस्ट्रेलियन वुमन्स संघात तिचा समावेश आहे. तिचं नाव लिली बॅसिंगथवेट आहे. लिली सध्या तिच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे चर्चेत आहे. तिच्या या शैलीमुळेच ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्त्वाची खेळाडू ठरली आहे. बॅसिंगथवेटने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत नेपाळविरुद्ध जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमवून 139 धावा केल्या होत्या. पण नेपाळचा संघ 8 विकेट गमवून 58 धावा करू शकला. यात दोन विकेट या लीलीने घेतल्या होत्या. या सामन्यात तिने एकूण 3 षटकं टाकली आणि फक्त 4 धावा दिल्या. आयसीसीने इन्स्टाग्रामवर लिलीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्या गोलंदाजीची झलक दिसत आहे. या व्हिडीओत लिलीला विचारलं की, ‘तुला सर्वात जास्त आवडता असा कोणता आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे का आणि का?’
लिलीने या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, ‘मला जसप्रीत बुमराह म्हणायचे आहे. कारण त्याच कोपरही वाढलेलं होतं. आणि माझं पण तसंच काहीसं आहे, म्हणून लोक म्हणतात की मी गोलंदाजी करते तेव्हा त्याच्यासारखी दिसते?’ यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज लिलीला विचारलं की, ‘तू सहमत आहे का?’ यावर लिली म्हणाली, ‘नक्कीच’.
View this post on Instagram
बॅसिंगथवेटला बुमराहबद्दल विचारलं की, ‘एक खेळाडू म्हणून तुला त्याच्याबद्दल आवडणारी सर्वाधिक गोष्ट कोणती?’ याला उत्तर देताना लिली म्हणाली, ‘मला त्याची मानसिकता आवडते. तो नेहमी विकेट घेण्यासाठी मार्ग शोधतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ते चांगले असते की नाही हे मला माहीत नाही. पण त्याला गोलंदाजी करताना पाहणे चांगले वाटते.’
