AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : स्कॉटलंडला पराभूत करण्याचे वांधे, पाकिस्तानची भारत विरुद्धची प्रतिक्षा यंदाही कायम राहणार!

Icc Womens T20 World Cup 2026: आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना काही दिवसात हायव्हल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 14 जून भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत. मात्र पाकिस्तानची या सामन्याआधीच फजिती झाली आहे. जाणून घ्या काय झालं.

IND vs PAK : स्कॉटलंडला पराभूत करण्याचे वांधे, पाकिस्तानची भारत विरुद्धची प्रतिक्षा यंदाही कायम राहणार!
Harmanpreet Kaur IND vs PAKImage Credit source: PTI
| Updated on: Jun 10, 2026 | 5:55 PM
Share

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला (Icc Womens T20i World Cup 2026)  आता मोजून काही तास बाकी आहेत. स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात नोव्हेंबर 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे आता भारतीय महिला क्रिकेट संघाचं टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 14 जून रोजी खेळणार आहे. भारताचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असा असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. भारतासह पाकिस्तानचाही हा वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना असणार आहे. मात्र या सामन्याआधीच पाकिस्तान टीमची जगासमोर नाचक्की झाली. त्यामुळे पाकिस्तानची 10 वर्षांची प्रतिक्षा यंदाही कायम राहणार असंच चित्र आहे.

पाकिस्तानची सराव सामन्यातच फजिती

खेळाडूंना सरावा व्हावा आणि संघाची मोट बांधण्यात मदत व्हावी या हेतूने वर्ल्ड कप स्पर्धेआधी सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. पाकिस्तानला या सराव सामन्यात तुलनेत कमजोर असलेल्या स्कॉटलंडकडून पराभूत व्हावं लागलं. उभयसंघात 9 जून रोजी सराव सामना खेळवण्यात आला. स्कॉटलंडने या सामन्यात पाकिस्तानला डीएलएसनुसार 41 धावांनी धुव्वा उडवला.

सामन्यात काय झालं?

स्कॉटलंडने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. स्कॉटलंडने त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 60 धावांआधीच 5 झटके देत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. पाऊस न थांबल्याने सामन्याचा निकाल डीएलएसनुसार लावण्यात आला. स्कॉटलंडने अशाप्रकारे 41 धावांनी विजय मिळवला.

पाकिस्तानची टीम इंडिया विरुद्धची प्रतिक्षा यंदाही कायम राहणार

आता स्कॉटलंड विरुद्ध अपयशी ठरलेली पाकिस्तान टीम इंडियाला काय पराभूत करणार? असं क्रिकेट वर्तुळात म्हटलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची 10 वर्षांपासूनची प्रतिक्षा कायम राहिल असं म्हटलं जातंय.  वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरीस 10 वर्षांआधी पराभूत केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला यंदाही टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवणं अवघड ठरणार इतकं मात्र निश्चित आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा