AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC WWC 2022: एकटी हरमनप्रीत लढली, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

ICC WWC 2022: आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 (ICC Womens world cup 2022) स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडने भारतावर (IND vs NZ) 62 धावांनी विजय मिळवला.

ICC WWC 2022: एकटी हरमनप्रीत लढली, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय
महिला वर्ल्डकप न्यूझीलंडकडून भारत पराभूत Image Credit source: Twitter/ WHITEFERNS
| Updated on: Mar 10, 2022 | 1:49 PM
Share

हॅमिल्टन: आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 (ICC Womens world cup 2022) स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडने भारतावर (IND vs NZ) 62 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने विजयासाठी 261 धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारताचा डाव 198 धावात संपुष्टात आला. भारताकडून एकट्या हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) प्रतिकार केला. तिने 63 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. हरमनप्रीतचा अपवाद वगळता अन्य भारतीय महिला फलंदाज अपयशी ठरल्या. आजचा सामना जिंकण्यासाठी सलामीवीर स्मृती मानधना, मिताली राज यांच्याकडून जबरदस्त खेळाची अपेक्षा होती. पण तशी कामगिरी करणं त्यांना करता आली नाही. वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर 107 धावांनी मोठा विजय मिळवला होता.

खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती

हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावरील भारतीय महिला संघाचा हा तिसरा पराभव आहे. वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडता हा सलग दुसरा विजय आहे. याआधी त्यांनी बांग्लादेशवर विजय मिळवला होता. सेडन पार्कची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती. भारतीय संघात चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय महिला संघ विजय मिळवेल अशी अपेक्षा होती. पण न्यूझीलंडने धारदार गोलंदाजी केली व भारताला विजयापासून दूर ठेवलं. भारतीय संघ 200 च्या आकड्यापर्यंतही पोहोचू शकला नाही. भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मितालीने 56 चेंडू खेळले

स्मृती मानधना आणि मिताली राज या भारताच्या भरवशाच्या खेळाडू फ्लॉप ठरल्या. स्मृती अवघ्या 6 रन्सवर तर मिताली 31 धावांवर बाद झाली. मितालीने 31 धावा करण्यासाठी 56 चेंडू घेतले, यात फक्त एक चौकार होता. मागच्या सामन्यात तडाखेबंद खेळी करणारी स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकार आज फलंदाजीत चमक दाखवू शकले नाहीत. स्नेहने 18 आणि पूजाने 6 धावा केल्या. पूजाने गोलंदाजीत मात्र चमक दाखवली. तिने न्यूझीलंडच्या चार विकेट घेतल्या.

न्यूझीलंडकडून कोणी चांगली फलंदाजी केली?

न्यूझीलंडकडून अमेलिया कार आणि एमीने शानदार खेळ दाखवला. कारने (50) तर एमीने (75) धावा केल्या. त्याशिवाय कॅटि मार्टिनच्या (41) आणि सोफिया डिवाइनच्या (35) धावा काढून चांगली साथ दिली. तत्पूर्वी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने दोन, झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.