Rohit Shamra | “रोहित शर्माचा अखेरचा सामना…”! सेमी फायनलआधी मोठं विधान
Rohit Sharma | रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाला आपल्या नेतृत्वात एक एक करुन सलग 9 सामने जिंकून दिले. टीम इंडियाने ऑस्टेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाना पाणी पाजलं. आता टीम इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज झाली आहे. त्याआधी रोहितच्या वानखेडेतील अखेरच्या सामन्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वात विक्रमी कामगिरी केली. टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक आणि सलग 9 सामने जिंकण्याचा विक्रम केला. आता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपपासून 2 पाऊल दूर आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांना तिसरा वर्ल्ड कप आता दिसू लागला आहे. रोहित शर्मा आपल्या कॅप्टन्सीत भारताला विश्व कप जिंकून देणार असल्याचा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे. रोहितच्या वयामुळे त्याचा हा अखेरचा वर्ल्ड कप असल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमी फायनल सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. 15 नोव्हेंबरला होणार आहे. वानखेडे म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि रोहितचं घरचं मैदान अर्थात होम ग्राउंड. या सामन्यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अमोल काळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहितचा हा घरच्या मैदानातील अखेरचा सामना आहे का, असा प्रश्न काळे यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर काळे यांनी उत्तर दिलं.
अमोल काळे काय म्हणाले?
“मला नाही वाटत की वानखेडेत रोहितचा हा अखेरचा सामना असेल. याबाबत रोहितने अधिकृत काहीही म्हटलेलं नाही.रोहित आता चांगला खेळतोय. तो धमाकेदार कामगिरी करतोय. मला नाही वाटत की रोहितचा हा अखेरचा सामना असेल”, असं अमोल काळे म्हणाले. रोहितने या वर्ल्ड कपमधील साखळी फेरीत धमाका केला. रोहितने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. रोहितने 9 सामन्यांमध्ये 503 धावा केल्या. रोहितने उत्तम बॅटिंग करत नेतृत्वाचीही जबाबदारी पार पडली.
ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम
वानखेडे स्टेडियम ऐतिहासक मैदान आहे. टीम इंडियाने याच स्टेडियममध्ये 2011 साली वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. तसेच या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका विरुद्ध टीम इंडियाने 302 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडियाच्या चाहत्यांना न्यूझीलंड विरुद्ध अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
