Rohit Virat : रोहित-विराटवर हल्लाबोल, दिग्गज भारतीय खेळाडू काय म्हणाला?

Rohit Sharma And Virat Kohli : न्यूझीलंड विरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही अपयशी ठरले.त्यामुळे सध्या हे दोघे अनेकांच्या निशाण्यावर आहेत.

Rohit Virat : रोहित-विराटवर हल्लाबोल, दिग्गज भारतीय खेळाडू काय म्हणाला?
rohit sharma and virat kohli test cricketImage Credit source: Bcci
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 12:21 AM

न्यूझीलंडविरुद्ध भारताने कसोटी मालिका गमावली. इतकंच नाही भारताला मायदेशात 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशने पराभूत व्हावं लागलं. या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियावर आणि अनुभवी खेळाडू या नात्याने आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांवर सडकून टीका केली जात आहे. टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी यांनी विराट आणि रोहितवर हल्लाबोल केला आहे. आता हे दोघे अपयशी ठरले तर त्यांनी निवृत्ती घ्यायला हवी, असं घावरी म्हणाले. ऑस्ट्रेलिया दौरा दोघांसाठी अखेरची संधी असायला हवी. त्या दौऱ्यात दोघेही अपयशी ठरले, तर त्यांनी निवृत्ती घ्यावी, असं घावरींना वाटतं.

करसन घावरी काय म्हणाले?

“आता जर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दाघोांना सूर गवसला नाही, तर त्या दोघांनी सोडून द्यायला हवं. ऑस्ट्रेलियात जर त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर त्यांनी निवृत्त व्हायला हवं. विराट आणि रोहितने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केलंय. मात्र संघाला विजयाची गरज आहे. आपल्याला भविष्यातील संघ तयार करण्याची गरज आहे. जे कामगिरी करु शकत नाहीत त्यांना कुठवर टीममध्ये ठेवायचं”, असा प्रश्नही घावरी यांनी उपस्थित केला. न्यूझीलंडविरुद्धच्या व्हाईटवॉशनंतर घावरींनी ही प्रतिक्रिया दिली.

विराट-रोहित अपयशी

विराट आणि रोहित या दा दोघांना न्यूझीलंडविरुद्ध बॅटिंगने काही खास करता आलं नाही. विराटने 6 डावांमध्ये 15.50 च्या सरासरीने 93 धावा केल्या. तर रोहितने 15.16 च्या एव्हरेजने 91 रन्स केल्या. त्यामुळे आता या दोघांवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या अनुभवी जोडीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काय रणनिती असणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.