IML Final 2025 : इंडिया विरुद्ध विंडीज महामुकाबला, सामन्याला किती वाजता सुरुवात?
India Masters vs West Indies Masters Final Live Streaming : इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स दोन्ही संघ याआधी साखळी फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा इंडिया मास्टर्सने विंडीजवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा इंडिया मास्टर्स अंतिम फेरीत विंडीजचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज आहे.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी 20 स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या अंतिम सामन्यात इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. सचिन तेंडुलकर याच्याकडे इंडिया मास्टर्सच्या कर्णधारपदाची धुरा आहे. तर ब्रायन लारा वेस्ट इंडिज मास्टर्सचं नेतृत्व करणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या अंतिम सामन्यानिमित्ताने पुन्हा एकदा या 2 दिग्गजांना ऑन फिल्ड पाहता येणार आहे. याआधी दोन्ही संघ 8 मार्च रोजी साखळी फेरीत भिडले होते. तेव्हा इंडिया मास्टर्सने वेस्ट इंडीज मास्टर्सवर 7 धावांनी विजय मिळवला होता. आता या अंतिम सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स अंतिम सामना केव्हा?
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स अंतिम सामना रविवारी 16 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स अंतिम सामना कुठे?
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स अंतिम सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स अंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स अंतिम सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स अंतिम सामना टीव्हीवर कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्स या 2 चॅनेलवर पाहायला मिळेल. तर हा सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहता येईल.
महामुकाबला
𝙏𝙝𝙚 𝙁𝙞𝙣𝙖𝙡 𝘾𝙤𝙪𝙣𝙩𝙙𝙤𝙬𝙣 𝙩𝙤 𝙑𝙞𝙘𝙩𝙤𝙧𝙮 𝘽𝙚𝙜𝙞𝙣𝙨 𝙉𝙤𝙬! 🏆⏳
Join us for the thrilling finale between #IndiaMasters and #WestIndiesMasters in their quest for the ultimate title! 🏆#IMLT20 #TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex pic.twitter.com/914d4q4Xk5
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) March 16, 2025
इंडिया मास्टर्स टीम : सचिन तेंडुलकर (कर्णधार), अंबाती रायुडू (विकेटकीपर), पवन नेगी, युवराज सिंग, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, इरफान पठाण, गुरकीरत सिंग मान, विनय कुमार, शाहबाज नदीम, धवल कुलकर्णी, नमन ओझा, सौरभ तिवारी, अभिमन्यू मिथुन आणि राहुल शर्मा.
वेस्ट इंडिज मास्टर्स टीम : ब्रायन लारा (कर्णधार), ड्वेन स्मिथ, विल्यम पर्किन्स, लेंडल सिमन्स, चाडविक वॉल्टन, दिनेश रामदिन (विकेटकीपर), अॅशले नर्स, टिनो बेस्ट, जेरोम टेलर, सुलेमान बेन, रवी रामपॉल, कीर्क एडवर्ड्स, जोनाथन कार्टर, फिडेल एडवर्ड्स आणि नरसिंग देवनरीन.
