VIDEO : गोलंदाजी करताना डीजे ब्राव्हो मैदानातच पडला, शिमरॉनने घेतली गळाभेट, हेच आहे स्पिरीट ऑफ क्रिकेट

कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्स आणि गुयाना अमेजन वॉरियर्स या दोन संघामधील सामन्यामध्ये एक अशी गोष्ट झाली की ती पाहून प्रेक्षकांसह सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.

VIDEO : गोलंदाजी करताना डीजे ब्राव्हो मैदानातच पडला, शिमरॉनने घेतली गळाभेट, हेच आहे स्पिरीट ऑफ क्रिकेट
ब्राव्हो आणि हीटमायर

मुंबई : इंडियन प्रिमीयर लीगपूर्वी (IPL 2021) सध्या क्रिकेट रसिक कॅरेबियन प्रीमियर लीगचा (CPL) आनंद लुटत आहेत. भारतीय खेळाडू नसले तरी इतर देशांचे धाकड खेळाडू या लीगमध्ये खेळत असल्याने या सामन्यांमध्ये बरेच रोमहर्षक क्षण घडत असतात. उत्कृष्ट क्रिकेटसह काही अशाही घटना घडतात, ज्यामुळे प्रेक्षकांना भारी वाटतं किंवा ते चकीत देखील होतात. नुकताच पोलार्डला पंचाचा निर्णय न पटल्याने त्याने मैदानातच विरोध दर्शवत क्रिजपासून दूर गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर आता वेस्ट इंडिजचेच क्रिकेटपटू डीजे ब्राव्हो (DJ Bravo) आणि शिमरॉन हीटमायर ( shimron hetmyer) यांचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्स आणि गुयाना अमेजन वॉरियर्स यांच्या सुरु असलेल्या सामन्यात  गुयाना अमेजन वॉरियर्स फलंदाजी करत होता. त्यांच्याकडून मोहम्मद हाफीज आणि शिमरॉन हीटमायर क्रिजवर होते. त्यावेळी सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्स संघाकडून धाकड ऑलराउंडर ब्रावो 13 वी ओव्हर टाकत असताना अचानक जमिनीवर पडला. तो पडताच शिमरोन त्याच्यावर बॅट उगारुन त्याला मारु पाहत होता, अर्थात तो हे मस्तीत करत असून त्यानंतर काही क्षणातच त्याने आणि हाफीजने ब्राव्होला मिठी मारली. या मिठीचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच भारी वाटत असून CPL ने Spirit Of Cricket असं कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

असा झाला सामना

सामन्यात सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्सने गुयाना अमेजन वॉरियर्सला 6 विकेट्सने मात दिली. गुयाना अमेजन वॉरियर्सने विजयासाठी 167 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. ज्याचा पाठलाग करताना सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्स संघाने  19.2 ओव्हरमध्येच हे लक्ष्य पूर्ण करत सामना खिशात घातला.

हे ही वाचा

भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा

CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO

IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक झटका, बटलर, स्टोक्स, आर्चरनंतर आणखी एक इंग्लंडवासी दुखापतग्रस्त

(In CPL 2021 dwayne bravo and shimron hetmyer heartwarming video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI