T20 World Cup 2021: इंग्लंडचा सलग दुसरा विजय, तर बांग्लादेशची पराभवाची मालिका सुरुच

इंग्लंड क्रिकेट संघाने स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवत ग्रुप 1 मध्ये अव्वलस्थानी झेप घेतली आहे. त्यांनी बांग्लादेश संघाला 8 विकेट्सनी मात दिली आहे.

T20 World Cup 2021: इंग्लंडचा सलग दुसरा विजय, तर बांग्लादेशची पराभवाची मालिका सुरुच
इंग्लंडने स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे.
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 11:01 PM

T20 Cricket World Cup 2021: मागील एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2019) जिंकणाऱ्या इंग्लंड संघाने टी20 विश्वचषकातील कामगिरीही विजयाच्या दिशेनेच सुरु केली आहे. सुरुवातीच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला 6 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता इंग्लंडने बांंग्लादेश (England vs bangladesh) संघावरही 8 गडी राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे ग्रुप 1 मध्येही ते अव्वल स्थानी पोहोचले आहेत.

अबुधाबीच्या शेख जायद मैदानात पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. पण हा निर्णय़ इंग्लंडच्या बोलर्सनी साफ चूकीचा ठरवत बांग्लादेशला अवघ्या 124 धावांवर रोखलं. बांग्लेदशकडून मुशफिकूर रहिम याने केवळ 29 इतक्याच सर्वाधिक धावा केल्या. पण इंग्लंडकडून मात्र अनुभवी टायमल मिल्सने उत्कृष्ट अशा 3 विकेट्स मिळवल्या. तर लिव्हिंगस्टन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर ख्रिस वोक्सनेही एक विकेट घेतली. त्यामुळे अवघ्या 124 धावांवर बांग्लादेशचा डाव आटोपला.

जेसन रॉयची तुफान फलंदाजी

अवघ्या 125 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाने सुरुवातच जबरदस्त केली. सलामीवीर जेसन रॉयने 38 चेंडूत 61 धावा करत विजयाच मोलाचं योगदान दिलं. त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर बटलरने 18, डेविड मलानने नाबाद 28 आणि जॉनी बेयरस्टोवने नाबाद 8 धावा करत संघाचा विजय पक्का केला.

ग्रुप 1 ची स्थिती काय?

सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. यामध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाने 1 पैकी 1 सामना जिंकत अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळवलं आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकने 2 पैकी 1 सामना जिंकत चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही सामने पराभूत होत बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

सविस्तर गुणतालिका पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित

T20 Ranking: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा विराटला रँकिगमध्येही फटका, पाकिस्तानच्या रिजवानने टाकलं मागे

T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!

(In T20 World Cup 2021 England beat bangladesh with 8 wickets in hand and tops the Point table)

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.