VIDEO : अरेरे! असा कसा बाद झाला हा खेळाडू, विचित्ररित्या आऊट झाल्यानंतर पंचाच्या निर्णयाशी संघ असहमत

बांग्लादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामुळे मालिकेतही बांग्लादेशने 2-0 ची आघाडी घेतली आहे.

VIDEO : अरेरे! असा कसा बाद झाला हा खेळाडू, विचित्ररित्या आऊट झाल्यानंतर पंचाच्या निर्णयाशी संघ असहमत
बांग्लादेश विरुद्ध झिम्बाब्वे

हरारे : झिम्बाब्वे आणि बांग्लादेश (Zimbabwe vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक विचित्र विकेट पाहायला मिळाला. झिम्बाब्वे संघाचा कर्णधार ब्रेंडन टेलर (Brendan Taylor) हिट विकेट म्हणून आउट करार देण्यात आला. एक शॉट खेळल्यानंतर शॉटची प्रॅक्टिस करचाना ब्रेंडनची बॅट चूकून स्टम्पला लागली. ज्यामुळे त्याला बाद करार दिलं गेलं. 25 वी ओव्हर सुरु असताना ही घटना घडली. बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लामच्या बॉलवर ब्रेडनने अपर कट मारायचा ट्राय केला पण शॉट हुकला. त्यामुळे शॉटची प्रॅक्टिस करत असताना ब्रेंडनची बॅट स्टम्पला लागली आणि बेल्स खाली पडल्या. त्यानंतर थर्ड अंपायरच्या मदतीने त्याला बाद करार देण्यात आलं

ब्रेंडन टेलरला बाद करार दिल्यानंतर त्याठिकाणी बराच वाद झाला. त्याच्यामते जेव्हा त्याची बॅट स्टम्पला लागली तेव्हा बॉल निघून गेला होता. त्यामुळे ती डिलेव्हरी डेड झाली होती. पण पंचाच्या मते असे नसल्याने ब्रेंडनला आउट घोषित करण्यात आलं. क्रिकेटच्या नियमांचा विचार केला असता जर फलंदाज चेंडू खेळणार असेल किंवा खेळत असेल तेव्हा हिट विकेट झाल्यास बाद दिलं जात. पण चेंडू निघून गेल्यानंतर जर स्टंम्पस पडले तर फलंदाज बाद नसतो. पण या केसमध्ये अंपायरच्या मते चेंडू अजूनही अॅक्शनमध्ये होता. त्यामुळे बॉल डेड न देता बाद करार देण्यात आला.

सामन्यात विजयासह मालिकाही बांग्लादेशच्या खिशात

सामन्यात प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वे संघाने 240 धावा केल्या. ज्याच्या बदल्यात बांग्लादेशच्या शाकिब अल हसनने नाबाद 96 धावा करत तीन विकेट्सने संघाला जिंकवून दिलं. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही बांग्लादेशने 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे.

हे ही वाचा :

आकाश चोप्रा म्हणतो ‘हा’ भारतीय खेळाडू परग्रहावरचा, 2021 हाच गाजवणार

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे ‘शिखर’, एकाच सामन्यात अनेक विक्रम

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

(In Zimbabwe vs Bangladesh 2nd ODI Brendan Taylor hit Wicket Controversy see Video)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI