AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND A vs SA A: दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 392 धावांची गरज, भारतीय गोलंदाज 10 विकेट काढणार?

इंडिया ए संघाने दक्षिण अफ्रिका ए संघासमोर विजयासाठी 392 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने तिसऱ्या दिवशी दुसरा डाव 382 धावांवर घोषित केला. तसेच पहिल्या डावातील आघाडी मिळून विजयासाठी 417 धावांचं आव्हान दिलं. त्यामुळे शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे.

IND A vs SA A: दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 392 धावांची गरज, भारतीय गोलंदाज 10 विकेट काढणार?
दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 392 धावांची गरज, भारतीय गोलंदाज 10 विकेट काढणार?Image Credit source: PTI
| Updated on: Nov 08, 2025 | 6:39 PM
Share

इंडिया ए आणि दक्षिण अफ्रिका ए संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने आपल्या खिशात घातला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून दक्षिण अफ्रिकेला व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न असेल. तर दक्षिण अफ्रिका ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान, भारताने दुसर्‍या डावात 89.2 षटकांचा सामना 382 धावांवर 7 गडी गमावले आणि डाव घोषित केला. तसेच दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 417 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने सावध सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवशी एक गडी न गमावता दक्षिण अफ्रिकेने 25 धावा केल्या आहेत. आता चौथ्या म्हणजेच शेवटच्या दिवशी टीम इंडियाला 10 विकेट काढण्याचं आव्हान असणार आहे. अजूनही दक्षिण अफ्रिकेला 392 धावांची गरज आहे. त्यामुळे टीम इंडियाचे गोलंदाज पहिल्याच सत्रात झटपट विकेट काढण्यासाठी प्रयत्नशील असतील.

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताने पहिल्या डावात 77.1 षटकांचा सामना केला आणि 255 धावा केल्या. यात ध्रुव जुरेलच्या एकट्याच्या नाबाद 132 धावा होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने 47.3 षटकात सर्व गडी गमवून 221 धावा केल्या. पहिल्या डावात भारताला 34 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताकडून पुन्हा एकदा ध्रुव जुरेलची शतकी खेळी पाहायला मिळाली. ध्रुव जुरेलने हर्ष दुबेसोबत 184 धावांची भागादारी केली. त्यानंतर रिटायर्ड हर्ट झालेला पंत पुन्हा मैदानात उतरला आणि त्याने ध्रुव सोबत 54 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. यावेळी पंत 54 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत 65 धावांवर बाद झाला. तर ध्रुव जुरेलने 170 चेंडूत 15 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 127 धावा केल्या.

तिसऱ्या दिवसीचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने विनाबाद 25 धावा केल्या आहेत. जॉर्डन हरमनने नाबाद 15 आणि लेसेगो सेनोकवानने नाबाद 9 धावा केल्या आहेत. मोहम्मद सिराजने 6 षटकं टाकली असून 10 धावा दिल्या. तर आकाश दीपने 3 षटकात 10 आणि प्रसिद्ध कृष्णाने 2 षटकात 4 धावा दिल्या आहे. कुलदीप यादवने एकही षटक टाकलं नाही. त्यामुळे पहिल्या सत्रात कुलदीप यादवचा जलवा पाहायला मिळू शकतो.

Follow Us
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?