AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : 1 टेस्ट-3 वनडे, 4 सामन्यांसाठी टीम इंडिया सज्ज, द्विशतक करणाऱ्या फलंदाजाचं कमबॅक फिक्स! कोण आहे तो?

India Squad Vs Afghanistan 2026 : टीम इंडियाची अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. जून महिन्यात ही मालिका खेळवण्यात येणार आहे.

IND vs AFG : 1 टेस्ट-3 वनडे, 4 सामन्यांसाठी टीम इंडिया सज्ज, द्विशतक करणाऱ्या फलंदाजाचं कमबॅक फिक्स! कोण आहे तो?
Ishan Varun and Abhishek Sharma Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: May 14, 2026 | 10:55 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची (IPL 2026) 31 मे रोजी सांगता होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार रंगणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया मायदेशात एकूण 4 सामने खेळणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 1 कसोटी सामना आणि वनडे सीरिज खेळणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध भारत यांच्यात 6 ते 20 जून दरम्यान हे 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्याला अजून 3 आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी बाकी आहे. मात्र त्यानंतरही क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार? याची उत्सूकता लागून आहे.

उभयसंघातील एकमेव कसोटी सामना हा चंडीगडमधील मुल्लानपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 6 ते 10 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 14 ते 20 जून दरम्यान वनडे सीरिजचा थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाची घोषणा केव्हा?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय निवड समिती अफगाणिस्तान विरूद्धच्या 4 सामन्यांसाठी टीम इंडियाची मे महिन्यातील चौथ्या आठवड्यात घोषणा करु शकते. निवड समितीकडून जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात येऊ शकते. तर आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश करण्यात येऊ शकतो. त्यानुसार, गुरनूर ब्रार आणि आकीब नबी या दोघांना संधी मिळू शकते. तसेच कॅप्टन शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल हे तिघे या मालिकेचा भाग असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इशान किशन याचं कमबॅक?

मीडिया रिपोर्ट्नुसार, इशान किशन याचं भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन होऊ शकतं. इशानने आयपीएलआधी झालेल्या टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्यामुळे इशानचं वनडे टीममध्ये कमबॅक निश्चित समजलं जात आहे.

तसेच इशानने आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादासाठी 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच इशान वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणाऱ्या फलंदाजांपैकी 1 आहे. इशानने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 933 धावा केल्या आहेत. यात इशानच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे.

इशानचं कमबॅक म्हणजे पंतला डच्चू?

दरम्यान इशानचं एकदिवसीय संघात कमबॅक झाल्यास ऋषभ पंत याला डच्चू मिळू शकतो. इशान आण रिंकु दोघे विकेटकीपर आहेत. त्यामुळे आता इशानला संधी दिल्यास निवड समिती ऋषभ पंत याच्याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....