AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 2nd T-20 Toss : ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला टॉस, संघात दोन मोठे बदल

IND vs AUS 2nd T20 Toss : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकला आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघ पहिल्यांदा बॅटींग करताना दिसणार आहे. कांगारूंनी मोठी चाल खेळली असून संघात वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे.

IND vs AUS 2nd T-20 Toss : ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला टॉस, संघात दोन मोठे बदल
ind vs aus 2st t20 toss
| Updated on: Nov 26, 2023 | 6:57 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना काही वेळात सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारताने सीरिजमधील पहिला सामना जिंकला आहे.  दुसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कांगारूंनी बदल केलेले पाहायला मिळाले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झम्पा या दोघांना संघात घेतलं आहे.

टीम इंडियामध्ये आज कोणताही बदल केलेला पाहायला मिळाला नाही. सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यातील संघच दुसऱ्या टी-20 मध्ये कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाने आजच्या सामन्यात बेहरेनडॉर्फ आणि आरोन हार्डी यांना संघात स्थान मिळालेलं नाही. मॅथ्यू वेड याने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऋतुराजकडून अपेक्षा

पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरलेला ऋतुराज आजच्या सामन्यात किती धावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या ऋतुराजची बॅट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळपताना दिसली नाही. वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या झम्पाचं भारतीय फलंदाजांना आव्हान असणार आहे.

दरम्यान, टी-२० वर्ल्ड कप  विजेत्या संघासमोर युवा खेळाडूंचं आव्हान असणार आहे. सूर्याच्या नेतृत्त्वाखाली आजच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करताना किती धावा करतात हे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण ग्लेन मॅक्सवेलसारखा घातक खेळाडू कांगारूंच्या संघात परतला आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (w), सूर्यकुमार यादव (C), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीद कृष्णा.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (w/c), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, तन्वीर संघा

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.