India vs Australia 2020 | भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील प्रत्येक बाउंड्रीला एक चुंबन देईन, बॅनर घेऊन आलेल्या मुलीचा फोटो चर्चेत

या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी एकूण 28 चौकार आणि 16 सिक्सर लगावले.

India vs Australia 2020 | भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील  प्रत्येक बाउंड्रीला एक चुंबन देईन, बॅनर घेऊन आलेल्या मुलीचा फोटो चर्चेत
sanjay patil

|

Dec 07, 2020 | 11:10 AM

सिडनी : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात (India vs Australia 2nd T20I) ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. कोरोनामुळे सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना सामना पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली. यामुळे मोठ्या उत्साहात क्रिकेट चाहते सामन्याचा थरार अनुभवायला येतात. सामन्यादरम्यान अनेक गंमतीशीर घटना पाहायला मिळतात. अशीच एक गंमतीशीर घटना सामन्यात पाहायला मिळाली. Ind vs Aus 2nd T20I i kiss my partner for every boundary banner girl photo

नक्की प्रकार काय ?

या सामन्याला एक क्रिकेट चाहती एक फळक घेऊन आली होती. मी माझ्या पार्टनरला प्रत्येक चौकारावर किस (Kiss) करेन, असा आशयाचा हा फळक होता. सामन्याच्या पहिल्या डावातील 8 व्या ओव्हरदरम्यान या चाहतीवर कॅमेराची नजर पडली. त्यानंतर हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

ind vs aus t 20 kiss banner

दुसऱ्या सामन्यात एकूण 28 चौकार आणि 16 सिक्सर

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. या सामन्यात एकूण लांबलचक 16 षटकार आणि 28 चौकार पाहायला मिळाले. या सामन्यात जवळपास 400 धावा करण्यात आल्या. या थरारक सामन्याचा क्रिकेट चाहत्यांनीही आनंद घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करत 194 धावा केल्या. यामध्ये कर्णधार मॅथ्यू वेडने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 195 धावांचे आव्हान मिळाले.

मात्र टीम इंडियाकडून सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने तडाखेदार खेळी केली. यामुळे टीम इंडियाचा विजय झाला. धवनने अर्धशतकी खेळी केली. कर्णधार विराटने 24 चेंडूत 4o धावांची शानदार खेळी केली. तर हार्दिक पांड्याने निर्णायक क्षणी 22 चेंडूत नाबाद 42 धावांची विजयी खेळी केली.

दरम्यान अशी गंमतीशीर घटना घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलियविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अशीच घटना पाहायला मिळाली. हा दुसरा एकदिवसीय सामना 29 नोव्हेंबरला खेळण्यात आला. या सामन्यावेळेस एका भारतीय क्रिकेट चाहत्याने ऑस्ट्रेलियन मुलीला प्रपोज केलं. अगदी गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईल प्रपोज करत रिंग दिली. हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. दरम्यान या जोडप्यावर आता मीम्सही व्हायरल होत आहेत.

तिसरा सामना 8 डिसेंबरला

या टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी 8 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा मानस असेल. तर हा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर असेल.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020, 2nd Odi | जिंकलास भावा ! ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय पठ्ठ्याकडून ऑस्ट्रेलियन तरुणीला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

India vs Australia 2020 2nd T20 Updates : हार्दिकची फटकेबाजी, धवनचे अर्धशतक, अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात, सीरिजही जिंकली

Ind vs Aus 2nd T20I i kiss my partner for every boundary banner girl photo

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें