India vs Australia 2020, 2nd Odi | जिंकलास भावा ! ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय पठ्ठ्याकडून ऑस्ट्रेलियन तरुणीला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

हा सर्व प्रकार सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान घडला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:30 PM, 29 Nov 2020
India vs Australia 2020, 2nd Odi | जिंकलास भावा ! ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय पठ्ठ्याकडून ऑस्ट्रेलियन तरुणीला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

सिडनी : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली. अनेक सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चित्र विचित्र तसेच विनोदी घटना घडतात. अशीच एक रोमॅंटिक घटना या सामन्यादरम्यान घडली. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेक चाहते सामना पाहायला येतात. सामन्यादरम्यान मॅच पाहायला आलेल्या भारतीय तरुणाने ऑस्ट्रेलियाच्या तरुणीला चक्क मागणी घातली. या भारतीय तरुणाने आपल्या प्रेमाची कबुली दिली. या कपलने खेळाडूंसह सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ Fox Cricket ने ट्विट केला आहे. india vs australia 2020 2nd odi indian fan proposed to australian girl during 2 nd odi match in sydney, video viral

नक्की काय घडलं ?

या तरुणाने ऑस्ट्रेलियन युवतीला गुडघ्यावर बसून रिंग देत फिल्मी स्टाईल प्रपोज केलं. या प्रपोजला त्या ऑस्ट्रेलियन युवतीने होकार दिला. तसेच घट्ट मिठीही मारली. या जोडप्यासाठी उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी टाळ्या वाजवल्या. विशेष म्हणजे ग्लेन मॅक्सवेलनेही या जोडप्याचं अभिनंदन केलं. हा सर्व प्रकार सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान घडला.

दरम्यान या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे.

विराटच्या 22 हजार धावा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या दुसऱ्या सामन्यात पराक्रम केला. विराटने आंतरराष्ट्रीय सामन्यात 22 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो टीम इंडियाचा तिसरा तर एकूण आठवा फलंदाज ठरला. तसेच विराटचा हा एकदिवसीय कारकिर्दीतील 250 वा सामना होता.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू

India vs Australia 2020 | विराट कोहली वन डेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून कौतुक

India vs Australia 2020, 2nd Odi | कर्णधार कोहलीची ‘विराट’ कामगिरी, मानाच्या पंगतीत स्थान, ठरला तिसरा भारतीय

india vs australia 2020 2nd odi indian fan proposed to australian girl during 2 nd odi match in sydney, video viral