India vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी कोहलीने सिडनीच्या मैदानावर पाय ठेवताच आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:10 AM, 29 Nov 2020

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या वनडे (India Vs Australia) सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या नावावर खास विक्रम केला. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी कोहलीने सिडनीच्या (Sydney Cricket Ground) मैदानावर पाय ठेवताच आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. 250 एकदिवसीय मॅचेस खेळणारा कोहली 9 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. (Virat Kohli became 9th indian to Reach 250 ODI)

कोहलीअगोदर असा कारनामा 08 भारतीय खेळाडूंनी केला होता. यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, भारताचा माजी कर्णधार अजहर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, युवराज सिंह, विरेंद्र सेहवाग, एम.एस.धोनी यांच्या नावांचा समावेश होता. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात येताच विराटने 250 वनडे खेळणारा 9 वा भारतीय म्हणून विक्रम केला.

भारतातर्फे सर्वाधिक वनडे सचिन तेंडुलकरने खेळल्या आहेत. सचिनने 463 वनडे मॅच खेळल्या आहेत. सचिनपाठोपाठ धोनीने 350 वनडे मॅच खेळल्या आहेत. राहुल द्रविडच्या नावावर 344 मॅच, अजहरच्या नावावर 334 मॅच, गांगुली 311 मॅच तर युवराज सिंह 304 मॅच खेळला आहे. भारताचा महान खेळाडू अनिल कुंबळे 271 मॅच तर सेहवागने 251 मॅच खेळल्या आहेत.

तत्पूर्वी, आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आजही ऑस्ट्रेलियाने धडाक्यात सुरुवात केली. पहिल्या 11 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 71 धावा केल्या. याचदरम्यान डेव्हिड वॉर्नरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताचा 66 धावांनी पराभव केला होता. त्यामुळं ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यात 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाला या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर ‘करो या मरो’ची स्थिती असणार आहे.

(Virat Kohli became 9th indian to Reach 250 ODI)

संबंधित बातम्या

Ind vs Aus 2020, 2nd ODI Live Score Updates | ऑस्ट्रेलिया पहिला धक्का, अॅरॉन फिंच 60 धावांवर बाद

India vs Australia 1st ODI  : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कमाल, भारताचा 66 धावांनी पराभव

Photo | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये या पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी!