R Ashwin | आर अश्विन याचा पराक्रम, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा धमाका, दिग्ग्जाचा रेकॉर्ड ब्रेक

बॉर्डर गावसकर ट्ऱॉफीतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात आर अश्विन एका झटक्यात 2 मोठे रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत.

R Ashwin | आर अश्विन याचा पराक्रम, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा धमाका, दिग्ग्जाचा रेकॉर्ड ब्रेक
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 4:56 PM

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या डावात एकूण 47.2 ओव्हरमध्ये 91 धावा देत 6 विकेट्स पटकावल्या. मात्र अश्विन याने 5 वी विकेट घेत एकाच झटक्या 2 रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. विशेष बाब म्हणजे अश्विनने एकाच दिग्गजाचे हे दोन्ही रेकॉर्ड ब्रेक केलेत. अश्विन यासह अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

अश्विन याने टीम इंडियाचा दिग्गज आणि माजी फिरकी गोलंदाज अनिल कुबंळे याचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या सामन्याआधी अश्विनला हा महारेकॉर्ड करण्यासाठी 5 विकेट्सची गरज होती. अश्विनने टोड मर्फी याला एलबीडब्ल्यू करत हा रेकॉर्ड ब्रेक केला. आर अश्विन याच्या चौथ्या कसोटीआधी नावावर 107 विकेट्सची नोंद होती.

अनिल कुंबळे यांने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 111 विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान कुंबळे आणि अश्विन या दोघांशिवाय टीम इंडियाकडून एकाही गोलंदाजाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतलेल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा

तसेच अश्विन याने भारतात सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याबाबतही कुंबळेला पछाडलं आहे. अश्विनची भारतात 5 विकेट्स घेण्याची ही 26 वी वेळ ठरली. तर कुंबळेने 25 वेळा हा कारनामा केला होता.

ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 180 रन्स केल्या. त्यानंतर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची शतकी खेळी केली. उस्मान आणि ग्रीन या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फी याने नाबाद 41 धावा केल्या. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावा करुन माघारी परतला. नॅथन लायन याने 34 रन्सचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड याने 32 रन्स केल्या. पीटर हँड्सकॉम्ब याने 17, मिचेल स्टार्क 6 आणि मार्नस लाबुशेन याने 3 धावा केल्या. एलेक्स कॅरी याला अश्विनने भोपळाही फोडु दिला नाही. तर कुहनेमॅन शून्यावर नाबाद परतला. टीम इंडियाडून अश्विनशिवाय मोहम्मद शमी याने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.