AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 5th T20I Toss | ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, पहिली बॅटिंग कुणाची?

India vs Australia 5th T20I Toss | ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पाचव्या टी 20 सामन्यात नाणेफेकीचा कौल गेला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. दोन्ही टीमची प्लेईंग ईलेव्हन पाहा.

IND vs AUS 5th T20I Toss | ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, पहिली बॅटिंग कुणाची?
| Updated on: Dec 03, 2023 | 6:59 PM
Share

बंगळुरु | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम भारत दौऱ्यातील टी 20 सीरिजमधील पाचवा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. तर टीम इंडियानेही या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया ही मालिका 4-1 ने जिंकण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ही मालिका एकतर्फी होऊ न देण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन मॅथ्यु वेड याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही टीममध्ये 1 बदल

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी पाचव्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये दीपक चाहर याच्या जागी अर्शदीप सिंग याला संधी देण्यात आली आहे. दीपक चाहर याच्या घरी मेडीकल एमर्जन्सी असल्याने तो परतला आहे. त्यामुळे अर्शदीपला संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाने बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस ग्रीन याच्या जागी नॅथन एलिस याला संधी दिली आहे.

कॅप्टन सूर्या टॉस गमावल्यानंतर काय म्हणाला?

“पहिले बॉलिंग करायला आवडलं असतं. मी टीममधील सहकाऱ्यांना कोणताही बदल न करता त्यांच्या पद्धतीने खेळाला सांगितलं आहे. तसेच जाऊ खेळाचा आनंद घ्या असंही म्हटलंय.”, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉसनंतर दिली. आता टीम इंडियाचे फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर 20 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.