IND vs AUS, Video : पराभवानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर, रडत रडतच गेला ड्रेसिंग रुमममध्ये
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. अंतिम फेरी निर्विवाद यश मिळवत गाठलं. पण अखेर भ्रमनिरास झाला आहे.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियासोबत संपूर्ण देशाचं स्वप्न भंगलं आहे. विश्वचषक जेतेपदाचं स्वप्न स्वप्नच राहिलं आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावापासून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मिळवली. टीम इंडियाला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. भारताला 240 धावांवर रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 43 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं. त्यानंतर सलग 8 सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. तसेच टीम इंडियाला होमग्राऊंडवर पराभूत केलं. आता 2027 साली म्हणजेच पुढची चार वर्षे वर्ल्डकपसाठी वाट पाहावी लागणार आहे.
पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला अश्रू अनावर झाले. मैदानात अश्रूंना मोकळी वाट करून न देता धावत धावत ड्रेसिंग रुममध्ये गेला. गेल्या महिन्याभरापासून ज्या टायटलसाठी झटला ते जेतेपद हातातोंडाशी आल्यानंतर गमवल्याचं दु:ख स्पष्ट जाणवत होतं. रोहित शर्मा याचा हा शेवटचा वनडे वर्ल्डकप होता. त्यामुळे त्याच्या भावना या वर्ल्डकपशी निगडीत होत्या. 2019 वर्ल्डकपमध्येही उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.
Nothing is more painful than watching tears in Rohit Sharma eyes again after 2019 CWC!
#INDvsAUS #RohitSharma #INDvsAUSFinal pic.twitter.com/shA95pQG46
— Saurabh Singh (@100rabhsingh781) November 19, 2023
विराट कोहली 765 धावा करून या स्पर्धेत आघाडीवर राहिला. त्यानंतर रोहित शर्माने 597 धावा केल्या. पण पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली शेवट मात्र हवा तसा राहिला नाही. शुबमन गिल, श्रेयस फेल ठरले. सूर्यकुमार यादवही काही खास करू शकला नाही. पण ट्रेव्हिस हेडने अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
