IND vs AUS: ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कसं फसवलं? सामन्यानंतर शिवम दुबेने सांगितलं सिक्रेट
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा टी20 सामना जिंकून भारताने मालिका वाचवली आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात काहीही निकाल लागला तरी भारताला नो टेन्शन आहे. असं असताना चौथ्या सामन्यातील शिवम दुबेच्या कामगिरीची स्तुती होत आहे. या कामगिरीबाबत त्याने खुलासा केला.

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना रंगतदार झाला. कारण ऑस्ट्रेलियासमोर फक्त 168 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलिया त्यांच्याच भूमीत सहज गाठेल हे कोणालाही वाटेल. पण भारतीय गोलंदाजांनी तसं करू दिलं नाही. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फक्त 119 धावा करू दिल्या आणि हा सामना 48 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. चौथ्या टी20 सामन्यात शिवम दुबेने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही पातळींवर कमाल केली. तिसऱ्या क्रमांकावर उतरत त्याने 18 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत 22 धावा केल्या. तसेच गोलंदाजी करत 2 षटकात 20 धावा देत 2 गडी बाद केले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताला विजयाचा मोलाची साथ मिळाली. त्याने आपल्या गोलंदाजीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कसं फसवलं हे सामन्यानंतर जाहीर केलं.
विजयानंतर शिवम दुबे म्हणाला की, गौतम गंभीरने माला खूप पाठिंबा दिला. आक्रमक गोलंदाजी कर असं स्पष्ट केलं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. धावा होतील. पण मला वाटते की तू स्वत:ला व्यक्त करावं. शिवम दुबेने पुढे सांगितलं की, मोठी बाउंड्री असलेल्या मैदानात प्लाननुसार फलंदाजांना मोठे फटके मारण्यास मजबूर करायचं होतं. त्यानुसार रणनिती आखली होती. दरम्यान, शिवम दुबेने सांगितलं की, मोर्ने मॉर्कलने दिलेल्या काही छोट्या टीप्स कामी आल्या. त्यामुळे गोलंदाजीत खूपच सुधारणा झाली आहे. यापूर्वी प्रयत्न करूनही तसं होत नव्हतं.शिवम दुबेने कर्णधार मिचेल मार्श (30) आणि धोकादायक टिम डेव्हिड (14) यांना बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला.
दरम्यान, शिवम दुबेने मारलेल्या गगनचुंबी षटकाराचीही चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाकडून 11वं षटक टाकण्यासाठी एडम झाम्पा आला होता. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर शिवम दुबेने उत्तुंग षटकार मारला. झाम्पाने स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. त्यामुळे दुबेच्या रडारमध्ये आला आणि त्यांनी त्याला तशीच ट्रीटमेंट दिली. त्याने 106 मीटर लांब षटकार मारला. हा चेंडू थेट मैदानाचा बाहेर गेला. त्यामुळे नव्या चेंडूसह सामना खेळावा लागला.
